पिंपरी, दि. २४ – भारतीय जनता पक्षाच्या पुणे या ठिकाणी पार पडलेल्या महाराष्ट्र प्रदेश अधिवेशनात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या बद्दल केलेल्या बेताल वक्तव्याचा जाहीर निषेध करण्यासाठी शिवसेना पक्षाच्या वतीने पिंपरी येथील महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक या ठिकाणी शहा यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करून शहा यांच्या प्रतिमेस जोडो मारो आंदोलन करण्यात आले.
या निषेध आंदोलन प्रसंगी बोलताना मावळ लोकसभेचे संघटक व माजी महापौर संजोग वाघेरे पाटील यांनी अमित शहा यांच्या वक्तव्याचा तीव्र शब्दात निषेध करताना म्हणाले कि, पुरोगामी महाराष्ट्रात येऊन शिवसेना पक्ष प्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या विषयीचे अपशब्द बिलकुल खपवून घेतले जाणार नाहीत. महाराष्ट्रातून नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणूकींत भारतीय जनता पक्षाला अपेक्षित यश न मिळाल्याने या नैराश्याच्या भावनेतून उद्धवजी ठाकरे यांच्या विषयी निरर्थक व निंदनीय वक्तव्य केल्याचे दिसते. शहा यांच्यात उद्धव ठाकरे यांना हिंदुत्व शिकविण्याची पात्रता नाही.त्यामुळे हिंदू मुस्लीम यांच्यातील सलोखा बिघडविण्याचे काम शहा यांनी करू नये असा इशारा या वेळी वाघेरे यांनी दिला.
या प्रसंगी शिवसेना पुणे जिल्हा प्रमुख माजी आमदार गौतम चाबुकस्वार व माजी विरोधीपक्ष नेत्या व जिल्हा संघटिका सुलभाताई उबाळे यांनी निषेध नोंदवला. या आंदोलनास युवासेना प्रमुख चेतन पवार, पिंपरी विधानसभा अध्यक्ष तुषार नवले, चिंचवड विधानसभा अध्यक्ष अनंत कोऱ्हाळे, उपशहर प्रमुख राजाराम कुदळे, पिंपरी विधानसभा महीला संघटिका डॉ.वैशाली कुलथे, चिंचवड विधानसभा उपशहर संघटिका ज्योती भालके, उपविभाग संघटिका तस्लिम शेख, नीता लोखंडे, संदीप भालके, माधव मुळे, निखिल दळवी, कुदरत खान, ऋषिकेश सोनकांबळे, गोपाल मोरे, दीपक भक्त व शिवसैनिक – पदाधिकारी उपस्थित होते.