मुंबई, दि. ४ (पीसीबी) : विधानसभा निवडणुकांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृ्त्वातील शिवसेनेची स्टार प्रचारकांची यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये खुद्द एकनाथ शिंदे यांच्यासह रामदास कदम, गजानन कीर्तिकर, आनंदराव अडसूळ, नीलम गोऱ्हे या ज्येष्ठ नेत्यांची फौज उतरवण्यात आली आहे. यासोबतच शिंदे-फडणवीस महायुती सरकारच्या काळात मंत्रिपद भूषवलेले गुलाबराव पाटील, शंभूराज देसाई, दीपक केसरकर, उदय सामंत यांचाही समावेश आहे. विशेष म्हणजे अभिनेते गोविंदा, शरद पोंक्षे यांचाही ४० जणांच्या स्टार प्रचारकांच्या यादीत समावेश आहे. पायाला गोळी लागून झालेल्या अपघातानंतर गोविंदा पुन्हा एकदा सक्रिय होताना दिसत आहेत. याशिवाय राजू वाघमारे, अक्षय महाराज भोसले, तेजस्विनी केंद्रे यासारख्या नव्या चेहऱ्यांनाही स्थान देण्यात आले आहे.
शिवसेनेची स्टार प्रचारकांची यादी
- श्री एकनाथ शिंदे
- श्री रामदास कदम
- श्री गजानन कीर्तिकर
- श्री आनंदराव अडसूळ
- श्री प्रताप जाधव
- श्री गुलाबराव पाटील
- श्रीमती नीलम ताई गोऱ्हे
- श्रीमती मीनाताई कांबळी
- श्री उदय सामंत
- श्री शंभूराज देसाई
- श्री दीपक केसरकर
- श्री तानाजी सावंत
- श्री दादाजी भुसे
- श्री संजय राठोड
- श्री अब्दुल सत्तार
- श्री भरत गोगावले
- श्री संजय शिरसाट
- श्री श्रीकांत शिंदे
- श्री धैर्यशील माने
- श्री नरेश म्हस्के
- श्री श्रीरंग बारणे
- श्री मिलिंद देवरा
- श्री किरण पावसकर
- श्री राहुल शेवाळे
- श्री शरद पोंक्षे
- श्रीमती मनीषा कायंदे
- श्री गोविंदा आहुजा
- श्री कृपाल तुमाने
- डॉ दीपक सावंत
- श्री आनंद जाधव
- श्रीमती ज्योती वाघमारे
- श्रीमती शीतल म्हात्रे
- श्री राहुल लोंढे
- श्री हेमंत पाटील
- श्री हेमंत गोडसे
- डॉ राजू वाघमारे
- श्रीमती मीनाक्षी शिंदे
- श्रीमती ज्योती मेहेर
- श्री अक्षय महाराज भोसले
- श्रीमती तेजस्विनी केंद्रे