शिवसेना शहर प्रमुखांना शिवसेना समजली का ?

0
147

आयात उमेदवार नको म्हणता, मग संजोग वाघेरे कोण होते

 चिंचवड दि. 18 (पीसीबी) : आयात उमदेवाराचे आम्ही कारण कऱणार नाही, असा पवित्रा पिंपरी चिंचवड शहरातील शिवसैनिकांनी घेतलाय. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांचे कट्टर समर्थक माजी नगरसेवक मोरेश्वर भोंडवे यांचा काल उध्दव ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश झाला. खुद्द उध्दव ठाकरे आणि संजय राऊत यांनी शिवबंधन बांधून भोंडवे यांचे संघटनेत स्वागत केले. आता अशा वेळी शहर शिवसेनेचे शहर प्रमुख सचिन भोसले यांनी पुढाकार घेऊन जी विधाने केलीत त्याचा अर्थ त्यांना अजूनही शिवसेना उमगलेली नाही, असे म्हणावे लागेल. बाळासाहेब ठाकरे यांची मूळची शिवसेना केव्हाच हरवली. या शहरातील विविध प्रश्नांवर घरावर तुळशीपत्र ठेवणारे हाडाचे शिवसैनिक आजही आठवतात. ज्यांनी लाठ्या काठ्या खावून आंदोलने केली असे शिवसैनिचे नेते, कार्यकर्ते होते. पोलिसांच्या केसेसे अंगावर घेऊन कोर्टात खेटे घालणारे काही मोजके लोक शिल्लक आहेत. गेल्या १०-१५ वर्षांत शिवसेना काळानुरूप शिवसेना बदलली. आयात मंडळींनी संघटनेचा कब्जा घेतला आणि मूळच्या शिवसैनिकांचे पायपुसणे केले. आता प्रश्न मूळचे कोण आणि आयात कोण हा आहे.

खरे तर, ज्यांनी ही मागणी केली ते शहरप्रमुख सचिन भोसले यांनी २०१७ मध्ये महापालिका निवडणक काळात आयत्यावेळी शिवसेनेत प्रवेश केला, उमदवारी घेतली आणि नगरसेवक झाले. पिंपरी विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे माजी नगरसेवक गौतम चाबुकस्वार यांनी दोन दिवस अगोदर शिवसनेत प्रवेश केला आणि ते थेट आमदार झाले. मावळ लोकसभा उमेदवारीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमधून माजी नगरसेवक संजोग वाघेरे यांनी दहा दिवस अगोदर शिवसेनेत प्रवेश केला आणि त्याचवेळी खुद्द उध्दव ठाकरे यांनी त्यांच्या उमेदवारीची घोषणा केली. भोसरीत भाजपचे माजी नगरसेवक रवि लांडगे यांनी विधानसभा उमेदवारीसाठी महिन्यापूर्वी वाजतगाजत शिवसेनेत प्रवेश केला. आता ती जागा शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडे गेली. थोडे मागे गेले तर अगदी श्रीरंग बारणे, राहुल कलाटे यांचीपण नावे त्या यादीत येतात. म्हणूनच म्हटले आहे की, शिवसेनेची कार्यपध्दत त्यांच्या शहर प्रमुखालाच कळलेली दिसत नाही.

मोरेश्वर भोंडवे यांच्या प्रवेशासाठी प्रथम आम्हाला विचारले पाहिजे होते, अशी अपेक्षा शहरप्रमुख भोसले ठेवतात हाच मोठा विनोद आहे. उमेदवाराचे आम्ही काम करणार नाही, असा ठराव करणे हे एकप्रकारे थेट उध्दव ठाकरे आणि संजय राऊत यांनाच आव्हान दिल्यासारखे आहे. शिवसेनेत अशी लोकशाही नाही. आदेश येतो आणि त्यानुसार काम करायचे असते. मत मांडायचे तर त्यासाठी नेत्यांकडे वैयक्तीक बोलायचे असते. शिवसेनेत बंडाची भाषा कोणी केली तर त्याला बाहेरचा रस्ता दाखवतात.

मूळात शहरप्रमुख सचिन भोसले यांचे दुखणे वेगळेच आहे. महाविकास आघाडीच्या जागा वाटपात पिंपरी राखीव मतदारसंघातून त्यांना उनमेदवारी पाहिजे होती. पूर्वी शिवसेना तीन वेळा लढलेली असल्याने जागा वाटपात शिवसेनेकडे पिंपरी येईल असे त्यांना वाटत होते. प्रत्यक्षात शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने ती जागा घेतली आणि चिंचवड विधानसभा शिवसेनेच्या गळ्यात मारला. लोकसभा निवडणुकित इथे महायुतीचे श्रीरंग बारणे यांना तब्बल ७५ हजाराचे लीड होते. अशा परिस्थितीत ती जागा पुन्हा विधानसभेला महाविकास आघाडी जिंकण्याची शक्यता तशी कमीच. महाविकास आघाडीच्या जागा वाटपात आपली संधी गेल्याची सल भोसले यांना आहे. त्याचे उट्टे काढण्यासाठी त्यांनी भोंडवेंच्या प्रवेशाला विरोध केला. खरे तर त्यांना तो नैतिक अधिकार नाही. पक्ष वाढीसाठी आजवर बेरजेचे राजकारणाला ठाकरेंनी प्रधान्य दिले. अशा परिस्थितीत मोरेश्वर भोंडवे पक्षात आल्याने आभाळ कोसळणार नव्हते. चिंचवडची उमेदवारी त्यांनाच मिळेल की नाही ते दोन दिवसांत समजेल. राहुल कलाटे यांनी आपल्याला संधी मिळावी म्हणून मातोश्रीवर तळ ठोकला आहे. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेशी त्यांनी संधान बांधल्याने ठाकरे नाराज आहेत. नेतेमंडळींना वाटले तर कदाचित भोंडवे यांच्या जागेवर कलाटे उमेदवार असतीलही. हे राजकारण आहे. रवि लांडगे यांनी भोसरीतून उमेदवारी देणार असे सांगत त्यांचा प्रवेश करून घेतला. प्रत्यक्षात त्यांच्या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अजित गव्हाणे उमेदवार झाले. समिकरणे साथ देत नसतील तर भोंडवे यांच्या जागेवर उद्या कलाटे सुध्दा उमेदवार असतील. भोंडवे यांनी बळीचा बकरा करण्यासाठी म्हणून पक्षात घेतलेले नसावे