शिवसेना शहरप्रमुख सचिन भोसले यांच्यावर हल्ला

0
502

थेरगाव, दि.22 (पीसीबी)- चिंचवड विधानसभा पोटनिडणुकीतील महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा प्रचार करताना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शहरप्रमुख सचिन भोसले यांच्यावर हल्ला झाला आहे. ही घटना डांगे चौक मंगलनगर येथे आज (बुधवारी) सायंकाळी घडली.

ठाकरे गटाचे शिवसेना शहराध्यक्ष सचिन भोसले हे महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे यांच्यासाठी प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन प्रचार करत आहेत. तसेच राष्ट्रवादीचे कार्यकर्ते घरोघरी जात प्रचार करत होते. त्याचवेळी तिथे आलेल्या काही जणांनी भोसले यांच्यासह राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यावर हल्ला केला. त्यात भोसले यांच्या हाताला दुखापत झाली आहे. राष्ट्रवादीचे कार्यकर्ता गोरख पाषणाकर याचा पाय मोडला आहे. दोघांनाही उपचारासाठी बाणेर येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
थेरगाव येथील भाजप कार्यकरत्याने हल्ला केल्याचा संशय आहे