शिवसेना शहरप्रमुख अॅड. श्री सचिनभाऊ भोसले यांच्या नेतृत्वामध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन

0
362

पिंपरी, दि. २४ जुलै (पीसीबी) – शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) च्या वतीने भव्य रक्तदान शिबिर आयोजित केले होते. पिंपरी चिंचवड शहरांमध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त बाबासाहेब आंबेडकर पुतळ्या मागे,आंबेडकर चौक,पिंपरी या ठिकाणी शिवसेना शहरप्रमुख अॅड. श्री सचिनभाऊ भोसले यांच्या नेतृत्वामध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमाला विनायक राऊत (खासदार, प्रवक्ते), सचिन अहिर (संपर्कप्रमुख, पुणे जिल्हा), रवींद्र मेर्लेकर (उपनेते), आमदार गौतम चाबुकस्वार (जिल्हाप्रमुख), लतिका पाष्टे (महिला संपर्क पमुख), सुलभा उबाळे (जिल्हा संघटिक), शैला खंडागळे (जिल्हा संघटिका), केसरीनाथ पाटील (भोसरी व पिंपरी संपर्कप्रमुख), दिलीप घोडेकर (चिंचवड संपर्कप्रमुख), अशोक वाळके (पिंपरी चिंचवड निवडणूक प्रभारी), योगेश बाबर (माजी शहर प्रमुख), सचिन सानप (युवा जिल्हाप्रमुख). संजय दुर्गुळे (माजी नगरसेवक), श्रीराम पात्रे (माजी नगरसेवक), रेखा दर्शिले (माजी नगरसेविका), रवी खिल्लारे (माजी नगरसेवक), महादेव गव्हाणे (माजी नगरसेवक) हे उपस्थित होते.

रक्तदान शिबिराच्या नियोजन समितीचे काम संतोष वाळके (पिंपरी चिंचवड संघटक), कैलास नेवासकर( शहर समन्वयक), रोमी संधू (उपजिल्हाप्रमुख), हाजीभाई दस्तगीर मणियार (उपजिल्हाप्रमुख), निलेश मुटके (उपजिल्हाप्रमुख), अनिता तुतारे (शहर संघटिका), अनंत कोऱ्हाळे (चिंचवड विधानसभा प्रमुख), धनंजय आल्हाट (भोसरी विधानसभा प्रमुख), तुषार नवले, (पिंपरी विधानसभा प्रमुख), संतोष सौंदणकर (चिंचवड विधानसभा संघटक), युवराज कोकाटे (शहर संघटक), सुधाकर नलावडे (उपशहर प्रमुख), श्रीमंत गिरी (उपशहर प्रमुख), हरेश नखाते (उपशहर प्रमुख), संतोष पवार (उपशहर प्रमुख), नवनाथ तरस (उपशहर प्रमुख), अमोल निकम (उपशहर प्रमुख), पांडुरंग पाटील (उपशहर प्रमुख), तुषार सहाणे (शहर संघटक), नितीन दर्शले (विभाग प्रमुख), संदीप भालके (विभाग प्रमुख), दादा नरळे (विभाग प्रमुख), गोरख नवघणे (विभाग प्रमुख), गणेश आहेर, श्रीकांत चौधरी (विभाग प्रमुख), कृष्णा वाळके (विभाग प्रमुख) यांनी केले.

तसेच महिला पदाधिकारी प्रतीक्षाताई घुले, मंगला भोकरे (उपशहर प्रमुख), वैशाली कुलथे (उपशहर प्रमुख), रजनी वाघ (उपशहर प्रमुख), वैशाली घोडके, सुजाताताई नखाते, ज्योती भालके, कामिनी मिश्रा, सुजाता काटे, गीता कुसाळकर, शिल्पा आनपन, कमल गोडांबे, कलावती नाटेकर, ज्योतीताई गायकवाड, सुनिताताई सोनावणे, हर्षाली घरटे यांनीदेखील नियोजनामध्ये व स्वगातोस्तुक म्हणून काम पाहिले.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पिंपरी-चिंचवड-भोसरी शहरातील सर्व शिवसैनिक पदाधिकाऱ्यांनी कार्यक्रमात सहभाग घेवून स्वतः रक्तदान केले.मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यावर प्रेम करणारे अनेक नागरिक, बंधू-भगिनींनी रक्तदान शिबिरामध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग घेवून रक्तदान केले. 1123 रक्तदात्यांनी सहभाग घेवून या रक्तदान शिबिरामध्ये रक्तदान केले.

आमदार गौतम चाबुकस्वार यांनी उपस्थित प्रमुख पाहुण्यांचे व पदाधिकाऱ्यांचे स्वागत केले. विनायक राऊत (खासदार), सचिन आहिर, रविंद्रजी मेर्लेकर यांनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. तसेच भव्य प्रमाणावर रक्तदान शिबिराचे आयोजन केल्याबद्दल शहर शिवसेना पदाधिकाऱ्यांचे कौतुक केले. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, शिवसैनिकांनी तसेच शहरातील नागरिक, बंधू-भगिनी, युवा या सर्वांनी कार्यक्रम यशस्वी केल्याबद्दल सचिन भोसले यांनी सर्वांचे आभार मानले.