शिवसेना शरद पवारांनी संपवली का? , ठाकरे म्हणतात…

0
367

मुंबई,दि. २७ (पीसीबी) : शिवसेनेत एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केली अन् राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळलं. शिवेसेना फोडण्यामागे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा हात असल्याचा आरोप काही जण करीत आहेत. याला माजी मुख्यमंत्री, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज स्पष्टीकरण दिलं आहे. खासदार संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांची मुलाखती घेतली. याचा दुसरा भाग आज प्रसिद्ध झाला आहे. त्यात अनेक खुलासे ठाकरेंनी केले. राज्यातील सत्तातराबाबत बंडखोर आमदारांनी राष्ट्रवादीवर याचं खापर फोडलं. तर अनेकांनी शरद पवार यांनी उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री करुन शिवसेना संपवली असा आरोप केला. या सर्व आरोपांवर उद्धव ठाकरेंनी आज स्पष्टीकरण दिलं आहे.

शिवसेना शरद पवारांनी संपवली का? असा प्रश्न राऊतांनी त्यांना विचारला. उद्धव ठाकरे म्हणाले, “आधी भाजपबरोबर सत्तेत होतो तेव्हा भाजप त्रास देतोय असं म्हणायचे. भाजप नको असे सांगणारे हेच लोक गावागावात भाजप शिवसेनेला काम करू देत नाही. भाजप शिवसेनेला संपवतेय असा यांचा आक्षेप होता, “

“2019 मध्ये भाजपने खोटेपणाचा कळस केला. ठरवलेल्या गोष्टी नाकारतोय म्हणून आपण महाविकास आघाडीला जन्म दिला. तर म्हणे, आता कॉंग्रेस-राष्ट्रवादीवाले त्रास देतात. मग नेमकं तुम्हाला हवंय तरी काय? की फक्त कारणे शोधत आहात,” असे ठाकरे यांनी नमूद केले.फडणवीसांसोबत भाजप अशी का वागली? असा प्रश्न राऊतांनी ठाकरेंना विचारला. त्याला ठाकरेंनी खोचकपद्धतीने उत्तर दिले. ‘फडणवीस उपमुख्यमंत्री झाले ही उपरवालेची मेहरबानी,’ अशा शब्दात ठाकरेंनी टोला लगावला. फडणवीसांबाबत भाजप अशी का वागवी, हे कळालं नाही, असे ठाकरे म्हणाले,

ठाकरेंनी यावेळी एकनाथ शिंदे गट, भाजप, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्यावर टीकास्त्र डागले.ते म्हणाले, “शिंदेच्या रक्तात सत्तापिपासूपणा आहे. विश्वासघातकी शिंदेंना मुख्यमंत्री व्हायच होतं.शिवसैनिकांच्या अश्रूंची किंमत शिंदेंना मोजावी लागेल.