पिंपरी, दि. २३ (पीसीबी) – शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या पुणे जिल्हा प्रमुखपदी सुनील पवार यांची नियुक्ती कऱण्यात आली आहे. सुनील पवार हे उत्तमरित्या शिरूर आणि पुणे जिल्ह्यातील नागरिकांच्या रुग्णालयातील येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न करतील, असे माजी खासदार उपनेते शिवाजीदादा आढळराव पाटील यांनी म्हटले आहे.
बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून राज्यातील गोरगरीब आणि गरजवंत, आर्थिक दुर्लभ घटकातील रुग्णांना धर्मादाय रुग्णालयात राखीव बेड उपलब्ध करून देणे, निकषात बसत असलेल्या गरीब रुग्णांना पूर्ण मोफत किंवा सवलतीच्या दरात शस्त्रक्रिया करण्यासंदर्भातील मदत करणे तसेच महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत नोंदणी असलेल्या रुग्णालयांमध्ये गरजू रुग्णांना मोफत शस्त्रक्रिया करण्यासाठी मदत करण्यात येते.
गंभीर – महागड्या शस्त्रक्रिया करावयाच्या असलेल्या गोरगरीब गरजू रुग्णांना भरीव प्रमाणात अर्थ सहाय्य व्हाये याकरिता पंतप्रधान वैद्यकीय सहाय्यता निधी, मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी, तसेच अनेक ट्रस्टच्या माध्यमातून मदत मिळवून देण्याचे काम वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून केले जाते.
मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे यांच्या प्रेरणेने डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून नागरिकांना मदत केली जाते, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये 125 कोटी रुपये पेक्षा जास्त निधी मुख्यमंत्री वैद्यकीय कक्षातून देण्यात आलेला आहे, यातून अनेक गोरगरीब जनतेला फायदा झाला आहे.
निवडीबाबत शिवसेना उपनेते माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी असे म्हटले की, शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष पुणे जिल्हा प्रमुख पदी श्री. सुनील पवार यांच्या निवडीमुळे संपूर्ण पुणे जिल्ह्याला तसेच शिरूर लोकसभेतील नागरिकांना रुग्णालयात येणाऱ्या अडचणी तसेच वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी मदत होईल, तसेच मा. मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षाचे कार्य जनतेपर्यंत पोहचविण्याचे काम तत्परतेने करतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
शिवसेना उपनेते तथा कामगार नेते इरफान भाई सय्यद असे म्हणाले की, सुनील पवार यांच्या निवडीने शिवसेना वैद्यकीय मदत कक्षातून कामगारांना व नागरिकांना वैद्यकीय मदत मिळण्यास नक्कीच मदत होईल.
शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष मूळ संकल्पना तथा मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष प्रमुख, मुख्यमंत्री विशेष कार्य अधिकारी मंगेश चिवटे यांनी शिवसेना वैद्यकीय कक्षाच्या माध्यमातून रुग्णांना जास्तीत जास्त फायदा करून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करावेत जेणे करून नागरिकांना शासकीय योजनांचा फायदा होऊ शकतो यासाठी सुनील पवार नक्कीच मदत करतील अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
जिल्हाप्रमुख भगवानशेठ पोखरकर असे म्हणाले की, ग्रामीण भागातील नागरिकांना शहरी भागातील मोठ्या रुग्णालयांवर अवलंबून राहावे लागते, तिथे त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो, तिथे येणाऱ्या रुग्णांना मदत मिळवून देण्याकरिता श्री सुनील पवार यांची नक्कीच मदत होईल.
भोसरी विधानसभा प्रमुख दत्तात्रय भालेराव यांनी असे म्हटले की, शहरी भागातील सर्वसामान्य गरीब जनतेला मोठ्या हॉस्पिटल मधील सर्व सोयी सुविधा परवडत नाही मोठी बिले भरणे शक्य होत नाही या कामी शिवाजीदादा आढळराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली काम करत नागरिकांना दिलासा देण्याचे काम सुनील पवार नक्कीच करतील.