शिवसेना मजबूत असल्याचं लोकांना दाखवून द्या, ठाकरे यांचा जिल्हा प्रमुखांना आदेश

0
283

मुंबई, दि. १४ (पीसीबी) – शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी लढाईसाठी तयार राहण्याचे आदेश दिले आहेत. उद्धव ठाकरे यांची जिल्हाप्रमुख आणि पदाधिकाऱ्यांसोबत बैठक पार पडली. या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी हा आदेश दिला असून कोण गेलं याचा विचार न करता लोकांची कामं करा असा सल्लाही दिला. शिवसेना मजबूत असल्याचं लोकांना दाखवून द्या असं आवाहनही त्यांनी केलं.

शिवसेना आमदारांनी बंड पुकारल्यापासून उद्धव ठाकरे सक्रीय झाले आहेत. मातोश्री तसंच शिवसेना भवनात त्यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाप्रमुख, पदाधिकाऱ्यांच्या बैठका होत आहेत. त्यानुसार आजही संपर्कप्रमुख, जिल्हाप्रमुख आणि पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावण्यात आली होती. महापालिका, नगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंसमोर पक्षबांधणीचं मोठं आव्हान आहे.

या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी कोण गेले याचा विचार न करता निवडणुकीत शिवसेना मजबूत असल्याचं दाखवून द्या असं आवाहन केलं. तसंच लढाईसाठी तयार राहा सांगताना आघाडीसंदर्भातील निर्णय स्थानिक पातळीवर घ्या असं त्यांनी सांगितलं. तळागाळात जाऊन लोकांची कामं करा, मुंबईप्रमाणेच राज्यभरात कामं करा असा आदेशही त्यांनी यावेळी दिला