शिवसेना ठाकरे गटाचे 32 संभाव्य उमेदवारांची नावे

0
72

मुंबई, दि. 19 (पीसीबी) : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना ठाकरे गटाची येत्या दोन ते तीन दिवसात उमेदवारांची पहिली यादी जाहीर होणार आहे. पहिल्या यादीमध्ये साधारणपणे 60 ते 70 उमेदवार जाहीर केले जाऊ शकतात. यामधील बहुतांश उमेदवारांना तयारी करण्याचे आदेश पक्षाकडून देण्यात आले आहेत तर काहीजणांना लवकर एबी फॉर्म घेऊन जाण्याचे सुद्धा सांगितले गेले आहे.

ज्यांची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जात आहे अशा 32 जणांच्या संभाव्य उमेदवारांची माहिती एबीपी माझाला मिळाली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे 32 संभाव्य उमेदवार ज्यांची उमेदवारी जवळपास निश्चित झाली आहे. यातील दोन ते तीन उमेदवारांसंदर्भात पुनर्विचार चालू आहे. जिथे येत्या दोन दिवसात निर्णय घेऊन उमेदवारी जाहीर केली जाईल.

शिवसेना ठाकरे गटाच्या विधानसभा निवडणुकीसाठीच्या संभाव्य 32 उमेदवारांची यादी
१) आदित्य ठाकरे – वरळी
२) अजय चौधरी – शिवडी( सुधीर साळवी इच्छुक) पुनर्विचार होणार
३) राजन साळवी – राजापूर
४) वैभव नाईक – कुडाळ
५) नितीन देशमुख- बाळापूर
६) सुनिल राऊत – विक्रोळी
७) सुनिल प्रभू – दिंडोशी
८) भास्कर जाधव – गुहागर
९) रमेश कोरगावंकर – भांडुप पश्चिम
१०) प्रकाश फातर्फेकर – चेंबूर / (अनिल पाटणकर इच्छुक) पुनर्विचार होणार
११) कैलास पाटिल – धाराशिव
१२) संजय पोतनीस – कलिना
१३) उदयसिंह राजपूत – कन्नड
१४) राहुल पाटील – परभणी
१५) ऋतुजा लटके – अंधेरी पूर्व
१६) वरुण सरदेसाई – वांद्रे पूर्व
१७) स्नेहल जगताप – महाड मतदारसंघ
१८) सुधाकर बडगुजर – नाशिक पश्चिम
१९)अद्वय हिरे – मालेगाव बाह्य नाव आघाडीवर
२०) नितीन सावंत – कर्जत मतदारसंघ
२१) अनिल कदम – निफाड
२२) दीपेश म्हात्रे -डोंबिवली
२३)सुभाष भोईर – कल्याण ग्रामीण
२४)मनोहर भोईर – उरण
२५) किशनचंद तनवाणी -छत्रपती संभाजीनगर मध्य
२६)राजू शिंदे -छत्रपती संभाजीनगर पश्चिम
२७) दिनेश परदेशी- वैजापूर मतदारसंघ
२८)कन्नड मतदारसंघ – उदयसिंह राजपूत
२९) सुरेश बनकर- सिल्लोड मतदारसंघ –
३०) राजन तेली – सावंतवाडी
३१) दीपक आबा साळुंखे – सांगोला
३२ )विनोद घोसाळकर / तेजस्वी घोसाळकर – दहिसर