मतदार संघातील ठाकरेंचे शिवसैनिक राजीनाम्याच्या पवित्र्यात?
पिंपरी, दि. २२ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड भोसरी विधानसभेची जागा ही शिवसेना ठाकरे गटाच्या मशालीला सुटली नाही तर आम्ही तुतारीचा प्रचार करणार नाही. असा एकमुखी ठराव तर ठाकरेंच्या शिवसैनिकांनी केला असल्याची माहिती आहे. यावर आम्ही पदाचे राजीनामे देऊ, असा इशारा ही देण्यात आल्याची माहिती विश्वासू सूत्रांनी दिली आहे.
महाविकास आघाडीच्या जागावाटपात भोसरी शरद पवारांच्या राष्ट्रवादीला गेल्यात जमा आहे. याची कुणकुण लागल्यानं ठाकरेंचे शिवसैनिक आक्रमक पवित्र्यात आहेत. भोसरीतील शिवसैनिकांनी गुप्त बैठक घेत तुतारीचा प्रचार न करण्याचा ठराव केला, तसेच आम्ही राजीनामे ही देऊ. आत्ताच आपण मीडियात याबाबत बोलायला नको पण हा निरोप मातोश्रीवर जायला हवा, अशी भूमिका या शिवसैनिकांनी घेतली आहे.
पिंपरी आणि भोसरी विधानसभेत शरद पवार गटाच्या तुतारी चिन्हावर किंवा काँग्रेसने उमेदवार दिला, तर त्याचं काम आम्ही करणार नाही. भोसरी आणि पिंपरीत मशाल चिन्हचं हवं असा आग्रह ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी धरला आहे. महाविकास आघाडीच्या जागावाटपात भोसरी शरद पवारांच्या राष्ट्रवादीला गेल्यात जमा आहे. याची कुणकुण लागल्यानं ठाकरेंचे शिवसैनिक आक्रमक पवित्र्यात आहेत. भोसरीतील शिवसैनिकांनी गुप्त बैठक घेत तुतारीचा प्रचार न करण्याचा ठराव केला, तसेच आम्ही राजीनामे ही देऊ, असा पवित्रा कार्यकर्त्यांनी घेतला आहे.
तसे झाल्यास, महाविकास आघाडीच्या उमेदवारीच्या अपेक्षेने राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश केलेले आणि गेल्या दोन महिन्यांपासून मोठी तयारी करीत असलेले माजी स्थायी समिती सभापती अजित गव्हाणे यांच्या अडचणींमध्ये वाढ होणार आहे.
पिंपरी मतदार संघात अजितदादा गटाचा प्रचार न करण्याचा ठराव, भाजपचा राष्ट्रवादीला विरोध पिंपरी मतदारसंघावर महायुतीतील तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी दावा सांगायला सुरूवात केली आहे तर या ठिकाणी विद्यमान आमदार राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या (Ajit Pawar) पक्षाचा आहे, तर दुसरीकडे भाजपच्या नेत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अण्णा बनसोडे यांना विरोध दर्शवला आहे.
पिंपरी विधानसभेत अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा प्रचार करायचा नाही. असा ठराव करत भाजपने थेट आमदार अण्णा बनसोडेंना विरोध दर्शवला आहे. लोकसभेत कमळाचा उमेदवार मिळाला नाही आता आम्हाला कमळाचाचं उमेदवार हवा अशी आग्रही भूमिका बैठकीत एकमुखाने मांडण्यात आली आहे.
भाजपचे विधान परिषदेचे आमदार उमा खापरे आणि अमित गोरखेंसह पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांमध्ये राष्ट्रवादी विरोधी सूर लावल्याचं दिसून आलं. लोकसभेत अजित पवारांच्या राष्ट्रवादीने महायुतीचा प्रचार केला नाही मग आपण घडाळ्याचा प्रचार का करायचा? असा प्रश्न उपस्थित करण्यात आला. ठरल्याप्रमाणे ही मागणी महायुतीच्या जागावाटपाच्या बैठकीपूर्वी देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळेंकडे केली जाणार आहे, अशी माहिती आहे.
भोसरीतून सुलभा उबाळे आक्रमक…
शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या सुलभा उबाळे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. निष्ठावंत शिवसैनिक म्हणून उबाळे यांची पक्षात मोठी ‘स्पेस’ आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांच्या विश्वासातील नेत्या म्हणून त्यांची ओळख आहे. २००९, २०१४ असा दोन वेळा त्यांनी विधानसभा निवडणूक लढवली. सुरूवातील माजी आमदार विलास लांडे यांच्यासोबत थोडक्या मतांमध्ये त्यांना पराभव स्वीकारावा लागला होता. २०१४ मध्ये त्यांना दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली आहे. २०१९ मध्ये त्यांनी महायुती धर्माचे पालन केले आणि आमदार महेश लांडगे यांचा विजय सोपा झाला. आता सुलभा उबाळे यांना उमेदवारीसाठी प्रखर दावेदार मानले जाते. मात्र, पक्षात नव्याने प्रवेश केलेल्या इच्छुकांना उमेदवारी मिळावी म्हणून अप्रत्यक्ष ‘दबावगट’ तयार केला जात आहे. विशेष म्हणजे, एका आघाडीच्या वृत्तपत्रामध्ये ‘‘सुलभा उबाळे यांनी अजित गव्हाणे यांच्या उमेदवारीला पाठिंबा दिला’’ असे विश्लेषण प्रसिद्ध झाले होते. यावर सुलभा उबाळे यांनी सोशल मीडियावर ‘‘विचारुन लिहीत चला कुणाच्या सुपाऱ्या वाजवू नका’’ अशी आक्रमक प्रतिक्रिया नोंदवली आहे. उबाळे यांचा आक्रमक पवित्रा आणि शिवसैनिकांच्या प्रतिक्रिया याचा विचार केला असता, शिवसेना ठाकरे गट आणि उबाळे या निवडणुकीत माघार घेणार नाहीत, असे निरीक्षण राजकीय जाणकारांनी नोंदवले आहे.