शिवसेना उभी करण्यात बाळासाहेबांचे एकट्याचेच योगदान

0
196

पिंपरी, दि. ८ (पीसीबी) – हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी काढलेली शिवसेना ही संघटना आहे. त्यांनी स्वत: हयात असताना शिवतिर्थावर आता माझे वय झाले आहे. शिवसेनेची जबाबदारी उद्धव ठाकरे यांच्यावर देतो असे सांगितले. शिवसैनिकांनी उद्धवजींना साथ देण्याचे आवाहन केले. त्यांच्याच साक्षीने युवा नेतृत्व म्हणून आदित्य ठाकरे यांनाही महाराष्ट्राकरिता दिल्याचे त्यांनी सांगितले होते. शिवसेना उभी करण्यात बाळासाहेबांचे एकट्याचेच योगदान असल्याचे मत राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी व्यक्त केले.

शिवसेनेचा (पक्षचिन्ह) वाद अंतिम टप्यात आला असल्याबाबत विचारले असता आश्चर्यकारकपणे अजित पवार म्हणाले, वाद अंतिम टप्प्यात आला. अंतिम टप्प्यात आला म्हणजे उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकत्र बसले. त्यांच्या चर्चेला सुरुवात झाली आणि कुठेतरी मार्ग निघणार याला अंतिम टप्पा म्हणतो. परंतु, दस-याचे दोघांचे मेळावे बघितले तर अंतिम टप्प्यात न येता ते आता इतके ‘स्फोटक’ झाले आहे.

शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाबाबत विचारले असता ते म्हणाले, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी काढलेली शिवसेना ही संघटना आहे. त्यांनी स्वत: हयात असताना शिवतिर्थावर आता माझे वय झाले आहे. शिवसेनेची जबाबदारी उद्धव ठाकरे यांच्यावर देतो असे सांगितले. शिवसैनिकांनी उद्धवजींना साथ देण्याचे आवाहन केले. त्यांच्याच साक्षीने युवा नेतृत्व म्हणून आदित्य ठाकरे यांनाही महाराष्ट्राकरिता दिल्याचे सांगितले होते. बाळासाहेबांनी शिवसेना उभा केली आहे. त्यांच्या एकट्याचेच योगदान आहे. त्यांच्या भाषणाने, विचाराने शिवसेना सर्वदूरपर्यंत पोहचली. राज्यातील प्रमुख पक्षात शिवसेनेची नोंद झाली. धनुष्यबाणाच्या चिन्हाबाबत निवडणूक आयोग निर्णय देणार आहे. आजही शिवसेना (शिंदे गट) असा उल्लेख केला जातो. मूळ शिवसेना म्हणून उद्धव ठाकरे यांचाच उल्लेख केला जातो ही वस्तुस्थिती आहे, असेही ते म्हणाले.

दस-या मेळाव्यासाठी एसटी बस बुकिंग करुन नेल्या, त्यामुळे प्रवाशांना त्रास झाला. शक्तीप्रदर्शन यशस्वी झाले की नाही याचा विचार केला पाहिजे. मुख्यमंत्री ओरडून-ओरडून भाषण करत होते. कधीच एवढा आवाज चढलेला पाहिला नाही. पण, अतिशय मनावर घेवून भाषण केले. पण, भाषण सुरु असतानाच लोक निघून गेले होते. खुर्च्या मोकळ्या दिसत होत्या याकडेही पवार यांनी लक्ष्य वेधले. शरद पवार यांच्या निवास्थनावर हल्ला केल्यामुळे निलंबित केलेल्या एसटी कर्मचा-यांना पुन्हा सेवेत घेतल्याबाबत विचारले असता पवार म्हणाले, शिंदे सरकारकडून दुसरी काय अपेक्षा करणार आहोत? महागाई कमी करता येत नाही. त्यामुळे लोकांचे महागाई, बेरोजगाईकडचे लक्ष विचलित करण्यासाठी काहीतरी वेगळो करतो हे दाखविण्याचा केविलवाना प्रयत्न सरकार करत आहे.