देहूरोड, दि. 16 – देहूरोड येथील पीपल्स रिपब्लिकन पार्टीतील कार्यकार्त्यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उपशहरप्रमुख राजाराम कुदळे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून पक्षात जाहीर प्रवेश केला. तसेच, प्रवेशानंतर सर्वांनी मावळ लोकसभा मतदारसंघात संजोग वाघेरे पाटील यांना विजयी करण्याचा संकल्प केला.
देहूरोड बाजारमधील पीपल्स रिपब्लिकन पार्टीतील मच्छिंद्र मधुकर, नासिर शेख, आशिष तेलुगु, अंजिन राजले, आनंद सोनवणे, संजय वाणी यांचा समावेश आहे. संजोग वाघेरे पाटील हे समाजातील सर्व स्तरांमधील जनतेच्या सुख-दुःखात सहभागी होऊन त्यांना आधार देतात. नागरिकांच्या हक्क आणि अधिकारासाठी शासन दरबारी चोख पाठपुरावा करणाऱ्या संजोग वाघेरे पाटील यांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे राहू आणि या लोकसभेत मावळ मतदार संघात बदल निश्चित घडणार. लोकसभा निवडणुकीत संघटन मजबूत करून जनतेच्या माध्यमातून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांचे “मशाल” चिन्ह घरोघर पोहचवून उमेदवार वाघेरे पाटील यांना प्रचंड बहुमताने विजयी करू, असा विश्वास त्यांनी या वेळी व्यक्त केला.