शिवसेना आमदार संतोष बांगर शिंदे गटात सामील

0
284

मुंबई, दि. ४ (पीसीबी) – विधानसभेचं अध्यक्षपद जिंकत शिंदे-भाजपा सरकारने मोठा विजय मिळवला आहे. आता त्यांची दुसरी कसोटी आज विधानसभेत लागणार आहे. दरम्यान, राजकीय वर्तुळात शिवसेनेनंतर राष्ट्रवादीतही फुट पडल्याची चर्चा रंगली आहे. दरम्यान, १७० आमदार आमच्याकडे असल्याचा दावा शिंदे आणि फडणवीस यांनी केला आहे. संतोष बांगर यांनी काल राजन साळवी यांना मत दिले होते आणि आज ते शिंदे गटात सामिल झाल्याने शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे.

राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. रविवारी झालेल्या सभापती निवडणुकीच्या मतदानात राष्ट्रवादीचे पाच आमदार गैरहजर होते. त्यामुळे शरद पवारांच्या पक्षात मोठे वादळ येऊ शकते असे अनेक तर्क वितर्क लावण्यात येत आहेत.राष्ट्रवादीच्या 53 आमदारांपैकी केवळ 46 आमदारच सभापतीपदाच्या मतदानात भाग घेण्यासाठी विधानभवनात पोहोचू शकले. यातील नवाब मलिक आणि अनिल देशमुख तुरुंगात आहेत.