शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड हे दोन पक्ष एकत्र येणार

0
339

मुंबई, दि. २६ (पीसीबी) : शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड या दोन पक्षांनी एकत्र येणार असल्याचे जाहीर केले आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि संभाजी ब्रिगेड यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. यावेळी संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष मनोज आखरे, पक्षाचे प्रवक्ते गंगाधर बनबरे तसेच शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सुभाष देसाई उपस्थित होते.

केंद्रात भाजपाचे सरकार आहे. तर राज्यातदेखील शिवसेना आमदार फोडून भाजपाने सत्ता हस्तगत केली आहे. यावर यावेळी टीका करण्यात आली. प्रादेशिक पक्षांचे अस्तित्व संपुष्टात आणण्याचा भाजपाचा एककलमी कार्यक्रम आहे. त्यामुळे अस्मिता वाचवण्यासाठी समविचारी पक्षांनी तसेच व्यक्तींनी एकत्र येण्याची गरज आहे, असे मत उद्धव ठाकरे यांनी मांडले. भविष्यात संभाजी ब्रिगेड आणि शिवसेना एक युती म्हणून काम करेल, असे त्यांनी सांगितले.