शिवविचारांचा वारसा पुढच्या पिढीला देण्याचे काम राजवारसा आर्टिफॅक्टस शस्त्र दालन अविरतपणे करेल- अभिनेत्री मृणाल कुलकर्णी.

0
121

पिंपरी चिंचवड शहरामध्ये गेली बारा वर्ष शंभूराजे मर्दानी खेळ विकास मंचच्या माध्यमातून शेकडो विद्यार्थ्यांना लाठी काठी, तलवारबाजी चे प्रशिक्षण व शिवकालीन शस्त्रांचे भव्य प्रदर्शन अनेकवेळा करण्यात आले आहे. यातूनच प्रेरणा घेऊन चित्रपट निर्मिती क्षेत्रात देखील पदार्पण केले आहे. राज वारसा प्रोडक्शन च्या माध्यमातून आतापर्यंत शिवराज अष्टक मालिकेतील शेर शिवराज व सुभेदार या चित्रपटांचीनिर्मिती केली आहे. सोबत अनेक ऐतिहासिक मराठी चित्रपटांमध्ये कलाकारांना शस्त्र प्रशिक्षण देखील संस्थेच्या माध्यमातून देण्यात आले आहे.

याचाच एक भाग म्हणून पिंपरी चिंचवड शहरामध्ये शिवकालीन शस्त्रांचे भव्य दालन चिंचवड येथील मंगलमूर्ती वाड्याच्या समोर आजपासून नागरिकांसाठी खुले करण्यात आले या शस्त्र दालनाचे उद्घाटन चिंचवड देवस्थानचे मुख्य विश्वस्त श्री. मंदार देव महाराज,सिने अभिनेत्री मृणाल कुलकर्णी, शिवराज अष्टक चे दिग्दर्शक श्री दिगपाल लांजेकर, अभिनेते अजय पुरकर, बिपिन सुर्वे, निखिल लांजेकर, पद्मश्री गिरीश प्रभुणे, संत तुकाराम महाराजांचे 11 वे वंशज श्री शिरीष महाराज मोरे,पुणे येथील शिवजयंती महोत्सवाचे मुख्य संघटक श्री अमित गायकवाड, बारा मावळ सरदार घराण्यांचे सर्व प्रतिनिधी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न झाले.

याप्रसंगी मनोगत व्यक्त करताना सिने अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांनी राज वारसा आर्टिफॅक्टस च्या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या. लाठी काठी प्रशिक्षण, चित्रपट निर्मिती शस्त्र प्रदर्शन यांच्या माध्यमातून सुरु झालेली राजवारसा ची वाटचाल ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा वारसा पुढील पिढीला दाखविण्याचे काम करत आहे, शिवरायांची युद्धनीती अभ्यासताना शिवरायांचे युद्धतंत्र व शस्त्र याची माहिती घराघरात पोहचविण्याचे काम राजवारसा आर्टिफॅक्टस निश्चितच करेल. शिवकालीन शस्त्रांचे कुतूहल हे सर्वांनाच असते राज वारसा आर्टिफॅक्टस च्या माध्यमातून शिवकालीन शस्त्र, शिवरायांच्या मूर्ती, प्रतिमा या दालनात मिळणार आहे. या माध्यमातून आपण पुढच्या पिढीला छत्रपती शिवरायांचे कार्य समजणार आहे.

यावेळी शुभेच्छा देताना पदमश्री गिरीश काका प्रभुणे यांनी शुभेच्छा मनोगत व्यक्त करताना चिंचवड ही क्रांतिकारकांची भूमी म्हणून ओळखली जाते, सर्वांचे आराध्य श्रीमान महासाधू मोरया गोसावी यांच्या आशीर्वादाने राज वारसा आर्टिफॅक्टस शस्त्र दालनाच्या माध्यमातून वारसा जतन करणारी भूमी अशी ओळख लवकरच निर्माण होणार अशी भावना व्यक्त केली.

या प्रसंगी राजवारसा आर्टिफॅक्टस हे अतिशय दर्जेदार अश्या प्रकारचे दालन स्वराज्य घराण्यांना तर ऊर्जा देईलच त्या प्रमाणे समाजातील सर्व घटकांना एक वेगळ्या प्रकारची प्रेरणा ह्या दालनाच्या माध्यमातून मिळेल असे मनोगत श्री अमित सुरेशराव गायकवाड ह्यांनी दिले. यावेळी उपजिल्हाधिकारी श्री हेमंत निकम,उद्योजक श्री. प्रताप बारणे, प्रसिद्ध शिल्पकार श्री. दीपक थोपटें,नगरसेविका अश्विनी चिंचवडे,नगरसेवक राजेंद्र गावडे,नगरसेवक सुरेश भोईर,रा. स्व संघांचे विभाग संघचालक श्री आप्पा गवारे, नगरसेवक प्रशांत शितोळे, श्री महेश्वर मराठे, इतिहास अभ्यासक श्री ब हि चिंचवडे, श्री.निलेश गावडे, विरगळ अभ्यासक श्री अनिल दुधाने, इतिहास लेखक श्री प्रसाद तारे, श्री विक्रम सिंह घाटगे, चित्रकार श्री. प्रमोद मोर्ती, श्री संतोष गायकवाड, सौ विशाखा कुलकर्णी, चिंचवड ग्रामस्थ, मयुरेश्वर मित्र मंडळ व इतर मान्यवर उपस्थित होते.

यावेळी सर्व प्रमुख पाहुण्यांचे राजवारसा आर्टिफॅक्टस च्या माध्यमातून स्व निर्मिती असलेली राजदंड धारी छत्रपती शिवरायांची मनमोहक मूर्ती देऊन श्री अशोक पाबळे, श्री निखिल मगर, श्री प्रसाद कुऱ्हे, श्री चिन्मय ब्रह्मे, श्री. सचिन काळभोर यांनी सन्मानित केले. यावेळी विविध विषयांमधील मान्यवर, इतिहास संशोधक, गड किल्ले संवर्धन सदस्य, शिवव्याख्याते, नागरिक बंधू भगिनीं मोठ्या प्रमाणात उपस्थित होते आलेल्या सर्व पाहुण्यांना मान्यवरांचे स्वागत करत श्री प्रद्योत पेंढारकर यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन सौ अर्चना पेंढारकर व आभार श्री हेमंत चव्हाण यांनी मानले.