शिवराज्याभिषेक दिनानिमित्त मानवंदना…

0
214

शाहूनगर (चिंचवड) :
शाहूनगर येथील शाहू वाचनालयाच्या वतीने साडेतीनशे वा शिवस्वराज्य दिन साजरा करण्यात आला. जेष्ठ उद्योजक लक्ष्मण टक्केकर यांच्या हस्ते शिवप्रतिमेचे पूजन करण्यात आले. वाचनालयाचे अध्यक्ष बालकिशन मुत्याल हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. शिवव्याख्याते राजेंद्र घावटे यांनी शिवराज्याभिषेकाची महती व्याख्यानातून सांगितली. “भारताच्या इतिहासातील ती एक अलौकिक घटना असून राज्याभिषेकामुळे लोककल्याणकारी आदर्श राज्याची स्थापना झाली. सुवर्णाक्षरांनी लिहावा असा हा इतिहास आहे.” असे ते म्हणाले. माजी नगरसेविका अनुराधा गोरखे, अधाटे गुरुजी, राजेंद्र पगारे, दयानंद कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
मनीषा पाटील यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन गणेश सहाणे यांनी तर आभार प्रदर्शन राजाराम रायकर यांनी केले.
कार्यक्रमाचे संयोजन प्राजक्ता पवार, रवींद्र अडसूळ, वंदना पगारे, निशा मुत्याल यांनी केले.