शिवपुत्र संभाजी या महानाट्याच्या प्रयोगाचे मोफत पास दिले नाही म्हणून फुकट्या पोलिसांची धमकी

0
403

पिंपरी, दि.१४(पीसीबी):- शिवपुत्र संभाजी या महानाट्याच्या प्रयोगाचे मोफत पास दिले नाही म्हणून हा प्रयोग कसा होतो तेच पाहतो अशी धमकी पिंपरी चिंचवड मधील एका पोलीस कर्मचाऱ्याने डॉ. अमोल कोल्हे यांना आज दिली. यासंदर्भात राज्याच्या गृहमंत्र्यांनी योग्य ती दखल घेऊन संबंधित पोलीस कर्मचाऱ्याला समज द्यावी अशी मागणी डॉ. अमोल कोल्हे यांनी थेट शिवपुत्र संभाजी महानाट्याच्या रंगमंचावरूनच केली.

यावेळी बोलताना डॉ. अमोल कोल्हे म्हणाले की यापूर्वी संभाजीनगर कोल्हापूर निपाणी या ठिकाणी जेव्हा प्रयोग झाले त्यावेळी पोलिसांनी खूप मोठे सहकार्य केले नाशिकमध्ये तर पोलीस आयुक्तांनी अडीच हजार पोलीस कर्मचाऱ्यांना त्यांच्या कुटुंबीयांसह तिकीट काढून हा प्रयोग दाखवला मात्र पिंपरी चिंचवड मध्ये आज अतिशय खेदजनक अनुभव आला आहे शिवपुत्र संभाजी नाटकाच्या प्रयोगाची फुकट तिकीटे मिळाली नाही म्हणून हा प्रयोग कसा होतो हेच पाहतो अशी धमकी एका पोलीस कर्मचाऱ्यांनी दिली अमोल कोल्हे म्हणाले की माझा विरोध हा व्यक्तीला नसून अशा प्रकारे फ्री पास मागणाऱ्या प्रवृत्तीला आहे.

सर्वसामान्य नागरिक जो कर भरतात त्यातून आपला पगार होतो असे असताना छत्रपतींचा इतिहास पाहण्यासाठी भीक मागता हे पोलिसांच्या उज्वल परंपरेला गालबोट लावणारे आहे 26 /11 च्या वेळी तसेच कोविडच्या काळात पोलिसांनी प्राणांची परवा न करता कामगिरी बजावली या उज्वल परंपरेला शिल्लक स्वार्थापायी गालबोट लावणे योग्य नसल्याचे अमोल कोल्हे यांनी यावेळी सांगितले त्याचवेळी राज्याच्या गृहमंत्र्यांनी संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांना जर छत्रपती संभाजींचा इतिहास कसा सादर होतो हे बघतो असे म्हणत असेल तर त्याला योग्य ती समज द्यावी अशी मागणी ही डॉ. अमोल कोल्हे यांनी यावेळी केली.