शिवनेरी बसची मालवाहू ट्रकला धडक

0
289

किवळे, दि. १४ (पीसीबी) – भरधाव वेगात असलेल्या शिवनेरी बसने एका मालवाहू ट्रकला मागून धडक दिली. मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर किवळे येथे बाहेर पडतात. बसमध्ये एकूण २६ प्रवासी होते. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. या अपघातामुळे एक्स्प्रेस वेच्या या पॅचवर वाहतूक कोंडी झाली होती.

अपघातादरम्यान मालवाहू ट्रक पलटी झाला. तसेच शिवनेरी बसचेही मोठे नुकसान झाले आहे.

ही बस प्रवाशांना घेऊन ठाण्याहून स्वारगेटला जात होती. ट्रकमध्ये प्लास्टिकच्या लगद्याचा माल होता. मालवाहू ट्रक सांगलीच्या दिशेने जात होता.

तीव्र उतारामुळे बस चालकाला वेगावर नियंत्रण ठेवता आले नाही. त्यामुळे हा अपघात झाला.

अपघातानंतर एक्स्प्रेस वेच्या पुणे लेनवर मोठी वाहतूक कोंडी झाली होती. महामार्ग राज्य पोलिस व रावेत पोलिसांच्या मदतीने महामार्गावर अपघातग्रस्त वाहन हटविण्याचे काम सुरू आहे.