शिवधर्म विवाह सोहळ्याची पत्रिका महाराष्ट्रात पुरोगामी विचार घट्ट करणारी.

0
4

दि. ३ ( पीसीबी )मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक तसेच संभाजी ब्रिगेड पिंपरी चिंचवडचे शहराध्यक्ष सतिश काळे यांच्‍या कन्‍येच्‍या शिवविवाह सोहळ्याची पत्रिका राज्‍यभर चर्चेचा विषय ठरत आहे छत्रपती शिवाजी महाराज शाहु-फुले-आंबेडकर आदींसह वारकरी परंपरा सांगणाऱ्या विचारांचा ठसा या पत्रिकेत उमटला आहे. शिवधर्म विवाह सोहळ्याची ही पत्रिका पुरोगामी विचार घट्ट करणारी असल्‍याची भावना राज्‍यभरातील विचारवंत मान्‍यवर व्‍यक्‍त करत आहेत.
सतिश काळे मराठा क्रांती मोर्चा संभाजी ब्रिगेडच्‍या माध्यमातून सामाजिक सेवेत कार्यरत आहेत. मराठा बांधव तसेच शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांवर आंदोलन करणे महापुरूषांच्‍या विचारांचा प्रचार आणि प्रसार करणे आदी कामात त्‍यांनी झोकून दिले आहे. महापुरूषांच्‍या विचारांचा पगडा त्‍यांच्‍यावर आहे त्‍याची झलक नुकतीच त्‍यांनी त्‍यांच्‍या कन्‍येच्‍या शिवधर्म विवाह सोहळ्यानिमित्‍त केलेल्‍या पत्रिकेतून पहायला मिळाली हा शिवविवाह सोहळा रविवारी ( दि. ९) दुपारी साडे बारा वाजता धाराशिव जिल्‍हा कळंब तालुक्‍यात मोहा रोड कळंब येथील बलाई मंगल कार्यालयात होणार आहे या शिवविवाह सोहळ्यास राज्‍यभरातील विविध सामाजिक राजकीय क्षेत्रातील विचारवंत मान्‍यवर उपस्‍थित राहणार आहेत.
अशी आहे पत्रिका –
रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज राजमाता जिजाऊ यांची प्रतिमा पत्रिकेच्‍या समोरील बाजूस दर्शविण्यात आली आहे पत्रिकेच्‍या आतील बाजूस डाव्‍या बाजूला शौर्याची गाथा सांगणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज राजमाता जिजाऊ यांच्‍या प्रतिमा आहेत तर पत्रिकेच्‍या उजव्‍या बाजूला समता बंधुता आणि न्‍यायाचे प्रतिक असलेले शाहु महाराज, महात्‍मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्‍या प्रतिमा आहेत तर महात्‍मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्‍या विचारांच्या नमूद केलेल्‍या ओळी पुरोगामी विचारांचा वारसा जपत असल्‍याचे चित्र आहे.

लाडकी कन्‍या तृप्‍ती हिचा शिवविवाह सोहळा रणजित यांच्‍याशी होत आहे हा शिवविवाह सोहळा महापुरूषांचे विचार पुढे घेऊन जाणारा ठरावा अशी अपेक्षा होती. त्‍यानुसार शिवविवाह सोहळ्याची पत्रिका बनवून घेतली अनेक सामाजिक राजकीय क्षेत्रातील मान्‍यवरांनी शुभार्शिवाद दिले याचा मनस्‍वी आनंद आहे, असे संभाजी ब्रिगेड पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष सतिश काळे यांनी म्हटले.