शिवतेजनगर-संभाजीनगर परिसरात “दिवाळी पहाट” कार्यक्रमांचे आयोजन

0
51

शिवतेजनगर, दि. 25 (पीसीबी) : शिवतेजनगर येथील स्वामी सेवा समर्थ सेवा प्रतिष्ठानच्या वतीने नंदिन सरीन प्रस्तुत “स्वर चांदण्यांचे” या दिवाळी पहाट कार्यक्रमाचे आयोजन मंगळवार दिनांक 29 ऑक्टोबर रोजी करण्यात आलेले आहे. स्वामी स्वामी समर्थ सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष नारायण बहिरवाडे हे मुख्य संयोजक आहेत. पिंपरी चिंचवड आयडॉल भूषण तोष्णीवाल, सूर नवा ध्यास नवा फेम अभयसिंह वाघचौरे, किशोरी सरीन, साहिल सारसर, किरण बेंद्रे, विजया चौहान हे गायन करणार आहेत. संगीतसाज नंदिन सरीन, प्रसाद कोठी, विनायक वाघचौरे, सतीश काळे यांचा आहे. प्रसिद्ध निवेदक- व्याख्याते राजेंद्र घावटे हे कार्यक्रमाचे निवेदन करणार आहेत.

संभाजीनगर येथील सिद्धिविनायक मंदिरात रविवार दिनांक २७ ऑक्टोबर रोजी “हॅलो सखी शिक्षक मंच” च्या वतीने स्वरगंध भक्तीसरगम प्रस्तुत दिवाळी पहाट चे आयोजन करण्यात आले आहे. पिंपरी चिंचवड शहरातील विविध माध्यमिक मराठी शाळांमध्ये इंग्रजीचे अध्यापन करणाऱ्या शिक्षकांचा ” हॅलो सखी” हा मंच सामाजिक क्षेत्रात सुद्धा कार्यरत आहे. संभाजीनगर येथील स्वा. सावरकर प्रतिष्ठान, स्वा. सावरकर मित्र मंडळ व सिद्धिविनायक जेष्ठ नागरिक संघाच्या सहकार्याने या दिवाळी पहाट चे आयोजन करण्यात आले आहे. राजगुरूनगर आयडॉल प्रदीप मोहिते हे प्रमुख गायक असून प्रकाश सुतार व कुडाळकर यांची साथसंगत आहे.
नागरिकांनी या दिवाळी पहाट कार्यक्रमांचा आस्वाद घेत दिवाळीचा आनंद द्विगुणित करावा, असे संयोजकांनी कळवले आहे.