शिवजयंती व अण्णाभाऊ साठे महोत्सवाची जागा विक्रीला मोठा विरोध, सर्व राजकीय पक्षांची निदर्शने

0
345

पिंपरी, दि. १० (पीसीबी) – पिंपरी चिंचवड येथील भक्ती शक्ती शिल्पाचे व उद्यानाचे जेव्हापासून लोकार्पण झाले तेव्हापासून पेठ क्र. २४, सर्वे नंबर १२,१३ व १४ निगडी प्राधिकरण या मोकळे जागेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त आठवडाभर विविध समाज प्रबोधनाचे कार्यक्रम या ठिकाणी आतापर्यंत पिंपरी चिंचवड महानगरपालिका व शिवजयंती महोत्सव समिती यांच्यामार्फत पालिका खर्चाने घेण्यात आलेले आहेत. भक्ती शक्ती उड्डाणपुलाचे काम चालू असताना याच जागेमध्ये मोठ्या प्रमाणात राडारोडा टाकण्यात आला होता, महानगरपालिकेच्या वतीने दोन ते तीन लाख रुपये खर्च करून हि सर्व जागा लेवल करण्यात आली, एकदा नव्हे तर तीन ते चार वर्षे ही जागा लेवल करण्यात येत होती.

याच जागेवर अनेक वर्षापासून शहरातील सर्वात मोठी शिवजयंती म्हणून याच ठिकाणी मोठमोठ्या ३०० कलाकारांचे महानाट्याचे कार्यक्रम पेठ क्र. २४, सर्वे नंबर १२, १३ व १४ या ठिकाणी घेण्यात आले. शहरातील भक्ती शक्ती हे महत्त्वाचे ठिकाण आहे व याच ठिकाणी लागून ही जागा आहे या जागेच्या आजूबाजूस परिसर पूर्णपणे सिमेंटचे जंगल उभे करण्यात आलेले आहे मोठ मोठ्या बिल्डिंग उभ्या राहिलेल्या आहेत प्राधिकरण निगडी येथील असणारी मोकळी जागा शहराचे प्रमुख आकर्षक असणाऱ्या भक्ती शक्तीला खेटून आहे जिचा पेठ क्र. २४, सर्वे नंबर १२, १३ व १४ आहे याच जागेवर शिवसृष्टी उभारण्यात यावी व ही जागा पूर्णपणे मोकळी ठेवण्यात यावी जेणेकरून शिवजयंती व अण्णाभाऊ साठे जयंती महोत्सवानिमित्त ही जागा वापरण्यात येईल.

शिवाजी महाराजांचा जन्म पुणे जिल्ह्यात झाला. स्वराज्याच्या निर्मितीची सुरुवात ज्या पुणे जिल्ह्यात झाली त्याच छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास, पराक्रम, प्रेरणा, नियोजन मार्गदर्शन अशा अनेक विषयावर या जागेवर अनेक नवीन संकल्पना राबवावी. भव्य दिव्य शिवसृष्टी उभारण्यात यावी जेणेकरून देश विदेशातून येणाऱ्या नागरिकांना देखील या ठिकाणी उत्सुकता वाढवावी व हे देशातील सर्वात मोठे पर्यटन स्थळ व्हावे याकरिता पेठ क्र. २४, सर्वे नंबर १२, १३ व १४ या मोकळ्या जागेत पी एम आर डी च्या जागेमध्ये शिवसृष्टी उभारण्यात यावी अशी तमाम शिवप्रेमी यांची तीव्र मागणी आहे.

पीएमआरडीए कडून हा भूखंड बिल्डरांना विकण्यात आलेला आहे. या गोष्टीचा आम्ही तीव्र शब्दात निषेध व्यक्त करतो. लवकरात लवकर विकलेला भूखंड हा पुन्हा पीएमआरडीए ने ताब्यात घ्यावा व यावर मोठी शिवसृष्टी उभारण्यात यावी ही जागा विविध कार्यक्रमासाठी नागरिकांसाठी खुली करण्यात यावी, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.

सर्वांनी मिळून पीएमआरडीए चे व्यवस्थापकीय संचालक यांना एक लेखी निवेदन दिले. त्यातील प्रमुख मागण्या पुढील प्रमाणे आहेत.

१) या शिवछत्रपतींच्या जयंती उत्सवाचा भूखंड बाबत पी एम आर डी ए व बांधकाम व्यवसायिकांमध्ये झालेले सर्व व्यवहार रद्द करण्यात यावेत.

२) या जागेत राज्य सरकार महानगरपालिका व पी एम आर डी ए ने छत्रपती शिवरायांच्या जीवनावर भव्य दिव्य “शिवसृष्टी” उभारण्यात यावी.

३) मनपाच्या वतीने होणारी शिवजयंती सालाबाद प्रमाणे याच जागेवर व्हावी.

४) मनपाच्या वतीने होणारी लोकशाहीर आण्णाभाऊ साठे जयंती उत्सव याच जागेवर व्हावी.

५) भक्ती शक्ती शिल्पसमूहासमोरील पी एम पी एल डेपोच्या जागेवर मेट्रोचे अखेरचे स्टेशन होणार. त्यावेळी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुतळ्याचे स्थलांतर करावे लागणार. त्यामुळे अण्णाभाऊंचा पुतळा याच जागेत बसवण्यात यावा.

६) समस्त निगडी ग्रामस्थांच्या “गाव जत्रेचा” (कुस्त्या, तमाशा) आदि कार्यक्रम याच जागेत होतात.

विक्री केलेला सदर भूखंड परत ताब्यात घेऊन हि जागा जनहिताच्या कार्यक्रमासाठी कायमस्वरूपी राखीव ठेवावी, अशी मागणी निवेदनात केली आहे.

आंदोलनात सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे, महिलाअध्यक्षा कविता आल्हाट,, मनसेचे शहराध्यक्ष सचिन चिखले, छावा संघटनेचे धनाजी येळकर पाटील, माजी नगरसेवक राजू मिसाळ, भाजप युवा मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस अनुप मोरे, माजी नगरसेविका संगीता ताम्हणे, आप चे शहर प्रमुख चेतन बेंद्रे, माजी महापौर कवीचंद भाट , राष्ट्रवादीचे प्रवक्ते विनायक रणसूबे, तसेच बाळा दाणवले, नरेंद्र बनसोडे, मेघा पळसकर, वैभवी घोडके, पुनम वाघ, युवराज कोकाटे, विठ्ठल शिंदे, भाऊसाहेब आडागळे, गणेश सरकटे, संतोष वाघ, सचिन आल्हाट, गणेश भांडवलकर, मोईन शेख, अण्णासाहेब कसबे, युवराज पवार राजेश हरगुडे, निखिल भोईर, पल्लवी पांढरे, मंगला मनुष्यस्वर, माधव पाटील, संगीता कोकणे, अरुण थोपटे, रोहिदास शिवणकर,राहुल येवले, सचिन उदागे, बाबा आलम, गणेश बाफना, सचिन काळभोर, वैभव फडतरे, मनोज लांडगे, जय सकट, प्रदीप घोडके, गणेश वाघमारे, सचिन बोराडे, वैभव फाळके, दीपक जी खैरनार आदीनी सहभाग घेतला होता.