शिवजयंतीला नरेंद्र मोदींचा असा आहे पुणे दौरा

0
223

पुणे, दि. ३० (पीसीबी) – पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पुणे दौरा पुढच्या महिन्यात होणार असल्याची बातमी आहे. अवघ्या चार महिन्यांत मोदी यांचा हा तिसरी पुणे दौरा असल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. आगामी लोकसभा निवडणूक उत्तर प्रदेशमधील वाराणसीच्या बरोबरच पुणे लोकसभा मतदारसंघातून लढविण्यासाठी मोदी स्वतःच चाचपणी करत असल्याचे सांगण्यात आले. महाराष्ट्रात भाजपला मोठा फटका बसणार असे सर्वेक्षणात निदर्शनास आल्याने भाजपची ही नवी खेळी आहे, अशीही चर्चा आहे.

फेब्रुवारी महिन्यात पुणे दौऱ्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी असणार आहेत. 19 फेब्रुवारी रोजी मोदी पुण्यात दाखल होणार असून पुण्यातील नवीन विमानतळाच्या टर्मिनलचे उद्घाटन आणि महात्मा फुले स्मारकाचे उद्घाटन मोदींच्या हस्ते होणार आहे. याशिवाय मोदींच्या हस्ते मेट्रो मार्गिकेचेही उद्घाटन होणार आहे. शिवाय पुण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा देखील होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 19 फेब्रुवारीला शिवजयंती असल्याने पंतप्रधान मोदी शिवनेरी किल्ल्यावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मस्थळावर नतमस्तक होणार, असेही समजले.

१ ऑगस्ट २०२३ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टीळक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्या निमित्ताने ते शहरात आले होते. नंतर ऑक्टोबरमध्ये त्यांचा एक धावता दौरा झाला. गेल्याच महिन्यात मुंबई येथील विविध प्रकल्पांचे उद्घाटनासाठीही ते आले होते. आता पुन्हा पुणे शहर दौऱ्यावर येत असल्याने तो चर्चेचा विषय आहे. लोकसभा निवडणुका मार्च अखेरीस जाहीर होतील आणि एप्रिलमध्ये मतदान व निकाल लागेल. निवडणुकित भाजप विरोधात काँग्रेस, शरद पवार यांची राष्ट्रवादी, ठाकरे यांची शिवसेना आणि आता वंचित अशी महाआघाडी एकत्र आली आहे. ४८ पैकी जवळपास सर्वच जागांवर महाआघाडीचे जागा वाटप तसेच संभाव्य उमेदवारांची नावेसुध्दा निश्चित झाली आहेत. एकास एक अशी लढत झाल्यास भाजपला मोठे जड जाणार, असे चित्र आहे. भाजपला कशाबशा अवघ्या २० जागांवर समाधान मानावे लागेल अशी धक्कादायक बातमी पुढे आली आहे.
लोकसभा अत्यंत बिकट होत चालल्याणे आता खुद्द मोदी यांनी पुणे शहरातूनही उमेदवारी जाहीर करावी अशी अनेकांची मागणी आहे. स्वतः मोदी हे पुणे शहरातून उमेदवार झालेच तर त्याचा लाभ संपूर्ण महाराष्ट्रात होईल आणि महायुतीला म्हणून किमान ४२ जागा मिळतील असा अंदाज लावण्यात आला आहे. मोदी उमेदवा राहिलेच तर त्याचा शरद पवार यांच्या पुणे आणि संपूर्ण परिसरावर सकारात्मक परिणाम संभवतो, असेही अंदाज व्यक्त केले जात आहेत. प्रामुख्याने पुणेसह बारामती, मावळ, शिरूर लोकसभा मतदारसंघातील सर्व जागा महायुतीच्या पदरात पडतील, असाही भाजपचा अंदाज आहे. त्याच अर्थाने मोदी यांचा दौरा अत्यंत महत्वाचा समजला जातो.