शिर्डीतून दहशतवाद्याला अटक

0
516

शिर्डी, दि. २० (पीसीबी) : महाराष्ट्र दहशतवादी विरोधी पथक आणि पंजाब दहशतवादी विरोधी पथकाने संयुक्त कारवाई करत एका दहशतवाद्याला अटक केली आहे. पंजाबमधील राजिंदर या दहशतवाद्यास शिर्डी येथून अटक करण्यात आली आहे.

१६ ऑगस्टला पंजाबमध पोलिस दलातील पोलीस निरीक्षकाच्या गाडीला IED लावून ती उडवण्याचा कट त्याने आखला होता, असा आरोप आहे. पंजाब ATS आणि महाराष्ट्र ATS ने एकत्र कारवाई करत राजेंदरला अटक केली आहे. आरोपीला पंजाब ATS च्या ताब्यात देण्यात आले असून अधिक तपास सुरू आहे.