शिरूरचे माजी आमदार बाबुराव पाचर्णे यांचं निधन

0
536

शिरूर दि. ११ (पीसीबी) -राजकीय वर्तुळातून एक धक्कादायक बातमी समोर येतीय . शिरूरचे माजी आमदार बाबुराव पाचर्णे यांचं दुःखद निधन झालं आहे .गेल्या काही दिवसांपासून शिरूरमधील खासगी रूग्णालयात पाचर्णे यांच्यावर उपचार चालू होते आणि आज सकाळी ११: ३५ ला त्यांची प्राणज्योत मालवली.

बाबुराव काशीनाथ पाचर्णे हे शिरूरमधून सलग २ वेळा आमदार म्हणून निवडून आले होते. आपल्या विकासकामांच्या जोरावर आमदार पाचार्णे यांनी या मतदारसंघावर पकड निर्माण केली होती . २०१९ साली त्यांना मात्र निवडणुकीत अपयश आलं होत . तसेच घोडगंगा सहकारी साखरकारखान्याचे अध्यक्ष, १० वर्ष ते जिल्हा परिषद सदस्य आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन अशी महत्वाची पद त्यांनी सांभाळली होती .

त्यांच्या मागे पत्नी मालती, मुलगा राहुल, मुलगी राणीताई, सून मेघना ,बहिणी असा परिवार आहे . पाचर्णे त्यांचे सर्वपक्षीय नेत्यांशी सलोख्याचे संबंध होते ते अतिशय मनमिळावू स्वभावाचे असल्याने राजकीय वर्तुळातून हळहळ व्यक्त केली जात आहे .