शिरगाव मध्ये दारूभट्टीवर पोलिसांचा छापा

0
56

शिरगाव, दि. 14 (प्रतिनिधी)

शिरगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत पवना नदीच्या काठावर सुरू असलेल्या एका दारू भट्टीवर शिरगाव पोलिसांनी छापा मारून कारवाई केली. यामध्ये आठ लाख 75 हजारांचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला आहे. ही कारवाई बुधवारी (दि. 13) दुपारी करण्यात आली.

याप्रकरणी पोलीस अंमलदार प्रसाद जंगीलवाड यांनी शिरगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार 26 वर्षीय महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिरगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत पवना नदीच्या काठावर दारूभट्टी सुरू असल्याची माहिती शिरगाव पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी छापा मारून कारवाई केली. यामध्ये आठ लाख 75 हजार रुपये किमतीचे 25 हजार लिटर रसायन नष्ट करण्यात आले आहे. शिरगाव पोलीस तपास करीत आहेत.