शिरगावात सुरू असलेल्या दारूभट्टीवर पोलिसांचा छापा

0
342

शिरगाव, दि. २१(पीसीबी) : मावळ तालुक्यातील शिरगाव येथे पवना नदीच्या किनारी सुरू असलेल्या दारूभट्टीवर पिंपरी चिंचवड पोलिसांनी छापा मारला. यामध्ये चार लाख 81 हजार रुपये किमतीचे साहित्य पोलिसांनी नष्ट केले. ही कारवाई सोमवारी (दि. 20) दुपारी करण्यात आली.

याप्रकरणी चार महिलांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस कॉन्स्टेबल दिलीप राठोड यांनी शिरगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महिलांनी पवना नदीच्या किनारी मोकळ्या शेतामध्ये बेकायदेशीरपणे हातभट्टीची दारू तयार करण्याकरिता कच्चे रसायन एकत्र केले. याबाबत माहिती मिळाली असता शिरगाव पोलिसांनी दारूभट्टीवर छापा मारून चार लाख 81 हजार रुपये किमतीचे कच्चे रसायन नष्ट केले. शिरगाव पोलीस तपास करीत आहेत.