शिरगावमध्ये दारू भट्टीवर गुन्हे शाखेचा छापा

0
74

शिरगाव,दि. 08 (पीसीबी)

शिरगाव मध्ये पवना नदीच्या काठावर सुरू असलेल्या एका दारूभट्टीवर गुन्हे शाखेने छापा मारला. ही कारवाई सोमवारी (दि. 7) सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास करण्यात आली.

पोलीस अंमलदार श्यामसुंदर गुट्टे यांनी याप्रकरणी शिरगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार 24 वर्षीय एका महिले विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिरगाव येथे पवना नदीच्या काठावर दारूभट्टी सुरू असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या युनिट पाचला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सोमवारी सायंकाळी दारू भट्टीवर छापा मारून कारवाई केली. यावेळी पोलिसांनी 5000 लिटर दारू तयार करण्यासाठी लावलेले रसायन नष्ट केले. पोलीस आल्याची चाहूल लागतात आरोपी महिला पळून गेली. शिरगाव पोलीस तपास करीत आहेत.