शिडी घेतल्याच्या संशयावरून तरुणास मारहाण

0
339

हिंजवडी, दि. ३० (पीसीबी) – शिडी घेतल्याच्या संशयावरून चार जणांनी एका तरुणाला मारहाण करून त्याला टेम्पोत बसवून नेत पुन्हा मारहाण केली. हे घटना बुधवारी (दि. 28) सायंकाळी हिंजवडी येथे घडली.

जैशमोहम्मद अब्दुलरहीम सिद्दीकी (वय 26, रा. हिंजवडी. मूळ रा. उत्तर प्रदेश) यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दत्ता काळकुटे, नागेश काळकुटे, कृष्णा काळकुटे, शाकीर शेख (सर्व रा. वारजे) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे त्यांच्या दुकानाच्या समोर बसले असताना आरोपी तिथे आले. फिर्यादी यांनी आरोपींची शिडी घेतल्याचा संशय त्यांना होता. त्यावरून आरोपींनी सुरुवातीला फिर्यादीकडे शिडीची मागणी केली. मात्र शिदीबाबत माहिती नसल्याने फिर्यादींनी सांगताच त्यांना आरोपींनी मारहाण मारहाण केली. त्यांना जबरदस्तीने टेम्पोत बसवून वारजे येथील आरोपींच्या फॅब्रिकेशनच्या शॉपवर घेऊन जात तिथे फिर्यादीस लोखंडी रॉडने डोक्यावर, हातावर, पाठीवर मारहाण करून दुखापत केली. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.