पिंपरी, दि. ९ (पीसीबी) – शिक्षणाबरोबरच विद्याथ्र्यांनी एखादी कला जोपासावी. तसेच ज्या क्षेत्राची आवड असेल त्या क्षेत्राची निवड करावी. पालकांनीही विद्याथ्र्यांच्या निवडीला प्रोत्साहन द्यावे, असे मत प्रसिद्ध सिनेअभिनेत्री सुरेखा कुडची यांनी व्यक्त केले.
पिंपरी – चिंचवड शहर तेली समाजाच्यावतीने आयोजित दहावी, बारावी तसेच विविध क्षेत्रात विशेष प्राविण्य मिळवलेल्या विद्याथ्र्यांचा गुणगौरव सोहळा व कौटुंबिक मेळाव्यात मार्गदर्शन करताना सुरेखा कुडची बोलत होत्या.
तेली समाजाचे आराध्य दैवत संत शिरोमणी श्री संताजी जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करून कार्यक्रमास सुरुवात झाली. दहावी,बारावीत विशेष प्राविण्य मिळवलेल्या ६० विद्याथ्र्यांना सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान रयत शिक्षण संस्थेचे पश्चिम महाराष्ट्र विभागिय अध्यक्ष के. डी. रत्नपारखी यांनी भूषविले. संस्थेचे मुख्य सचिव अॅड. वैâलास शेजवळ यांनी प्रास्ताविक केले.
चाटे कोचिंग क्लासचे संचालक महेश ढबाले, ज्येष्ठ पत्रकार पीसीबी टुडे चे संपादक अविनाश चिलेकर, अभिनेत्री पुजा रेड्डी, संस्थेचे संस्थापक बाळासाहेब शेलार, अध्यक्ष शिवराज शेलार यांनी मार्गदर्शन केले.सूत्रसंचालन दत्तात्रय उबाळे यांनी केले. नितीन जगनाडे यांनी आभार मानले.