शिंदे- फडणवीस सरकार राहणार की जाणार, आज फैसला

0
363

नवी दिल्ली, दि. १४ (पीसीबी) – शिंदे-फडणवीस ससरकार जाणार की राहणार यावर आज पुन्हा घमासान होणार आहे. हे सरकार जाणार की राहणार त्याचा फैसला आज होण्याची शक्यता आहे. राज्यातील सत्तासंघर्षावर आज सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी होणार आहे. ठाकरे गटाचा युक्तिवाद झाल्यानंतर शिंदे गटाच्या युक्तिवादाला सुरुवात झाली होती. परंतु वकिलांनी आणखी वेळ मागितल्याने आज ते युक्तिवाद करणार आहेत.

शिंदे गटाचे ज्येष्ठ वकील निरज किशन कौल आणि ज्येष्ठ वकील हरीश साळवे हे आज युक्तिवाद करतील. तसेच राज्यपालांच्या वतीने सॉलिटर जनरल तुषार मेहता बाजू मांडणार आहेत. मागील सुनावणी २ मार्च झाली होती. यावेळी सुनावणी केवळ २ तासांत संपली. २ मार्चला महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाची सुनावणी संपणार हे जवळपास निश्चित होते. सरन्यायाधिशांनीही तसे संकेत दिले होते. परंतु ज्येष्ठ विधिज्ञ हरिश साळवे यांनी ऑनलाईन हजेरी लावली. त्यामुळे सुनावणीला नवं वळण लागलं.शिंदेंच्या वकिलांनी कोर्ट गाजवलं होतं. यावेळी शिंदे गटाचे वकील निरश किशन कौल यांनी युक्तीवाद केला. त्यानंतर ज्येष्ठ वकील हरीश साळवे यांनी युक्तीवाद केला