शिंदे – फडणवीस सरकारकडून ठाकरे कुटुंबियांच्या सुरक्षेत कपात…

0
259

मुंबई,दि.२१(पीसीबी) – शिंदे -फडणवीस सरकारकडून उद्धव ठाकरे यांच्यासह आदित्य ठाकरे, तेजस ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांच्याही सुरक्षेतत कपात करण्यात आली आहे. मातोश्रीची सुरक्षाही कमी करण्यात आली आहे. तर दुसरीकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सुरक्षेत कपात करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. उद्धव ठाकरे यांच्यासह आदित्य ठाकरे,तेजस ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांच्याही सुरक्षेतही कपात करण्यात आली आहे. मातोश्रीची सुरक्षाही कमी करण्यात आली आहे.

गेल्या काही दिवसांपूर्वी राजकीय नेत्यांना धमकीचे फोन आल्याचे समोर आले होते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, शरद पवार यांच्यासह खासदार संजय राऊत यांनाही धमकीचे फोन आले होते. आता गृह विभागाने मातोश्री परिसर आणिउद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, तेजस ठाकर यांच्या सुरक्षेत कपात केल्याची माहिती समोर आली. ठाकरे कुटुंबियांतील सुरक्षेत दोन दिवसापूर्वीच कपात केल्याचे बोलले जात आहे. ठाकरे कुटुंबियांच्या सुरक्षेतील एक-एक एस्कॉर्ट व्हॅनही काढून घेण्यात आली आहेत. मातोश्रीवरील बंदोबस्तही कमी करण्यात आला आहे.

राज्याच्यागृह खात्याकडून उद्धव ठाकरे यांच्या सुरक्षा यंत्रणेत अचानक कपात करण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. साधारणपणे ६० ते ७० पोलीस अधिकारी आणि कर्मचारी ठाकरे कुटुंबियांच्या सुरक्षेततैनात असतात. मात्र आता यातील काहींना पुन्हा पोलीस ठाण्यांमध्ये रुजू होण्यास सांगण्यात आले आहे. उद्धव ठाकरे यांना झेड प्लस सिक्युरिटी तर आदित्य ठाकरे यांना वाय प्लस सिक्युरीटी होती. मात्र आता त्यांची सिक्युरिटीत कपात करण्यात आली आहे.

ठाकरे कुटुंबियांसह त्यांचे निवासस्थान व राज्यातील शिवसैनिकांचे श्रद्धास्थान असलेल्या मातोश्री निवासस्थान परिसरातील सुरक्षा देखील कमी करण्यात आली आहे. मातोश्रीवर मागच्या आणि पुढच्या अशा दोन्ही गेटवर पोलिस तैनात असतात. मात्र आता ती सुरक्षा कमी करण्यात आली आहे. दरम्यान सुरक्षा कमी केल्यानंतर यावरून राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे आहेत.