शिंदे-फडणवीस यांच्या संपर्कातील जयदत्त क्षिरसागर यांची ठाकरेंनी केली हकालपट्टी

0
285

बीड, दि. २२ (पीसीबी) : माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांचा शिवसेनेची म्हणजेच उद्धव ठाकरे या गटाशी आता कोणताही संबंध नाही, असं मराठवाडा शिवसेना संपर्कप्रमुख धोंडू पाटील यांनी आणि बीड जिल्हा शिवसेना जिल्हाप्रमुख उद्धव ठाकरे गट अनिलदादा जगताप यांनी आज पत्रकार परिषद घेत स्पष्ट केला आहे. उद्धव ठाकरे उद्या औरंगाबादच्या दौऱ्यावर जाणार आहेत. त्यापूर्वीच जयदत्त क्षीरसागर यांचा आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाशी संबंध नसल्याचं करण्यात आलं आहे.

राज्यात शिवसेनेत दोन गट पडले मोठ्या घडामोडी घडल्या. मात्र, बीडचे माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी आज तागायत आपली कसलीच भूमिका स्पष्ट केली नाही. त्यानंतर कसलाही उद्धव ठाकरे गटाचा प्रोटोकॉल त्यांनी पाळला नसून कोणत्याही बैठकीला कोणत्याही कार्यक्रमाला उपस्थित न राहून आपली भूमिका काय आहे हे वारंवार विचारून देखील स्पष्ट केली नसल्याने जयदत्त क्षीरसागर यांच्याबाबत उद्धव ठाकरेंनी मोठा निर्णय घेतला आहे.

उद्धव ठाकरेंनी घेतलेला निर्णय मराठवाडा संपर्कप्रमुख धोंडू पाटील आणि बीड जिल्हा शिवसेनाप्रमुख अनिल दादा जगताप यांनी जाहीर केला.माजी मंत्री जयंत क्षीरसागर यांचा शिवसेनेची म्हणजेच उद्धव ठाकरे गटाशी कसलाही संबंध नाही असं त्यांनी स्पष्ट केलं.

२०१९ ला जयदत्त क्षीरसागर शिवसेनेत –
जयदत्त श्रीरसागर यांनी २०१९ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी २२ मे २०१९ ला राष्ट्रवादी काँग्रेसचं घड्याळ हातातून उतरवून शिवसेनेचं शिवबंधन बांधलं होतं. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, सुभाष देसाई, संजय राऊत यांच्या उपस्थितीत क्षीरसागर यांनी राष्ट्रवादीला रामराम करत शिवसेनेत प्रवेश केला होता. आता तीन वर्षानंतर बदललेल्या राजकीय स्थितीनंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटाकडून जयदत्त क्षीरसागर यांचा पक्षाशी काही संबंध नसल्याचं सांगण्यात आलं आहे.