शिंदे गट भाजपमध्ये विलीन होणार

0
421

शिवसेना आमदार अपात्रतेचा निकाल काय लागणार याकडे राज्यातील जनतेचे लक्ष लागले आहे. दरम्यान या प्रकरणाचा निकाल लागण्यापूर्वीच शिवसेनेचा एकनाथ शिंदे गट भाजपमध्ये विलीन होणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागल्या आहेत. यादरम्यान काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी याबाबत महत्वाचे विधान केले आहे.

आमदार अपात्रतेच्या सुनावणीचा निकाल लागल्यानंतर जर शिंदे गटातील आमदार अपात्र ठरले तर भाजपने प्लॅन बी तयार करण्यात आल्याचे बोलले जात आहे. यादरम्यान शिवसेनेचा एकनाथ शिंदे गट हाभाजपमध्ये विलीन होणार, हे १०० टक्के खरं असल्याचे वडेट्टीवार म्हणाले आहेत. हे १०० टक्के खरं आहे असंच होणार आहे. भाजपची चाल एकनाथ शिंदे आणि अजित पवारांना कळेल, असे वडेट्टीवार म्हणाले.

त्यांना विधानसभेच्या २८८ जागा लढवायच्या आहेत. आता लोकसभेत किती जागा मिळतील हे कळले. ये सब देखते रह जाएंगे असेही वडेट्टीवार म्हणाले. जागा वाटपाबद्दल बोलताना वडेट्टीवारांनी सांगितलं की, आज दिल्लीत जागा वाटपसदर्भात पहिली बैठक होत आहे. कोणी कोणत्या जागा लढवाव्यात यावर चर्चा होईल. तसेच कॉंग्रेस २२ जागा लढवणार असल्याच्या चर्चांवर बोलताना काँग्रेसने किती जागा लढाव्यात यावर मी बोलणार नाही. इंडिया आघाडीच्या बैठकीत जे ठरेल ते आम्हाला मान्य आहे, असेही विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार यावेळी म्हणाले.