शिंदे गटाच्या मेळाव्यासाठी आलेल्या कार्यकर्त्यांनी केली मुंबई विद्यापीठीची कचरा कुंडी

0
254

मुंबई, दि. ६ (पीसीबी) : काल मुंबईत शिंदे गटाचा आणि ठाकरे गटाचा दसरा मेळावा पार पडला. यावेळी राज्यभरातील शिवसैनिकांनी हजेरी लावली होती. तर शिंदे गटाच्या मेळाव्यासाठी आलेल्या कार्यकर्त्यांनी मुंबई विद्यापीठीची कचराकुंडी केली आहे. दारूच्या बाटल्यांचा खच मुंबई विद्यापीठाच्या मैदानावर पडला असल्याचा आरोप युवासेनेने केला आहे तर यासंदर्भात आयोजकांवर कारवाई करण्याची मागणी युवासेनेकडून करण्यात येत आहे.

दरम्यान, राज्यभरातून आलेल्या शिंदे समर्थकांच्या गाड्यासाठी मुंबई विद्यापीठाचे मैदान देण्यात आले होते. त्यावेळी अनेकांनी तिथे मद्यपान करून दारूच्या बाटल्या टाकल्या आहेत. तर पाण्याच्या बाटल्या आणि इतर कचऱ्याचा खच या मैदानावर साचला आहे. तर राज्याचे मुख्यमंत्री या कार्यकर्त्यांवर कारवाई करणार का असा सवाल उपस्थित केला जात आहे.

मुंबईतील कलिना येथील विद्यापीठाची जागा पार्किंसाठी देण्यात आली होती. शिंदे गटाचे कार्यकर्ते एक दिवस आधीपासूनच मुंबईत दाखल झाले होते तर मेळाव्याच्या काही तास अगोदरपर्यंत लोकांची रीघ लागली होती. तर त्यांच्या मेळाव्यासाठी १ लाखाहून अधिक लोकांची गर्दी झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.