शिंदे गटाचे आयुष्य दोन-तीन महिन्यांचेच

0
152

एकनाथ शिंदे यांचा पक्ष फक्त दोन चार महिन्यांचाच आहे, असे म्हणत ठाकरे गटाते नेते अंबादास दानवे यांनी शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला आहे. तर विधानसभेपर्यंत हा पक्ष राहील असं वाटत नाही, असे म्हणत अंबादास दानवे यांनी शिंदे गटासंदर्भात भविष्यवाणीच केली. तर रामटेक आणि हिंगोलीमध्ये शिंदे गटाचा पत्ता कट झाल्याचे म्हणत टीकाही केली. ठाकरे गटाते नेते अंबादास दानवे यांनी केलेल्या टीकेवर शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी पलटवार केलाय. ‘2 ते 4 महिन्यानंतर ठाकरे गटाला उमेदवार काय कार्यकर्ता देखील मिळणार नाही. लाखोंच्या होणाऱ्या सभा आता हजारोंवर आल्यात अशी सध्याची परिस्थिती आहे’, असे संजय शिरसाट यांनी म्हटले तर काही दिवसांनी ठाकरे गटाचे नेते गल्लीत फिरताना दिसतील, असा खोचक टोलाही संजय शिरसाट यांनी लगावला आहे.

भाजपच्या अंकित असलेल्या शिंदे गटाचे सर्व उमेदवार ठरविण्याचे काम अमित शाह दिल्लीतून करतात. शिंदे गटाला किती आणि कोणत्याजाजा द्यायच्या हेसुध्दा नवी दिल्लीतून ठरते. सर्वेक्षणाच्या नावाखाली शिंदे गटाच्या रथीमहारथींना उमदवारी नाकारण्यात आली. लोकसभा निवडणिकित शिंदे गटाचे हाल पाहून विधानसभेला आपली डाळ शिजणार नाही, अशी कल्पना आल्याने शिंदेंच्या बरोबर असलेले आमदार अस्वस्थ आहेत.