दि.०१(पीसीबी)-राज्यातील निवडणुकीच्या रणधुमाळीत महायुतीत पक्ष वाढीवरून वाद उफळल्याचे दिसून येत आहे. यावर आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी जोरदार भाष्य केले आहे. राऊत म्हणाले की, शिंदे सेनेचा कोळथा दिल्लीतील अमित शहा काढणार असून, त्यामुळे शिंदेचे ३५ आमदार फुटणार आहेत.सद्य परिस्थितीत महायुतीत भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी पक्ष टिकवण्याचा प्रयत्न केला होता, पण राऊत म्हणाले की, महायुतीत काहीही आलबेल नाही. राऊत यांना आज उपचारानंतर माध्यमांसमोर आल्यावर त्यांनी शिंदे गटासह भाजपवर हल्ला केला.
संजय राऊत म्हणाले की, निवडणुका उद्यावर येऊन ठेपल्या असून, राज्यातील नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकीत पैशांचा प्रचंड खेळ सुरू आहे. एकेका निवडणुकीसाठी १०-१५ कोटी रुपये खर्च होत आहेत, ५-६ हेलिकॉप्टर वापरण्यात येत आहेत. या तिन्ही पक्षांमधील स्पर्धेमुळे राज्याची निवडणूक संस्कृती उद्ध्वस्त झाली आहे.
राऊत यांनी शिंदे गटावर थेट आरोप केला की, शिंदे यांचा पक्ष आधीच फुटलेला आहे आणि हा गट अमित शहांचा बनवलेला आहे. त्यांनी शिंदे यांचा कोळथा शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसल्याप्रमाणे दिल्लीतून काढला जाईल. राऊत म्हणाले की, पैशाच्या ताकदीवर निवडणुका जिंकणं म्हणजे लोकशाही नाही; पैशावर लोक विकत घेता येतात, पण राजकारण चालत नाही.शिंदे आणि भाजपवर घणाघाती हल्ला करत राऊत म्हणाले की, फडणवीस यांचं राजकारण शिंदे यांना कळत नसेल, तर त्यांनी असे राजकारण करू नये. लोकशाहीमध्ये पैशापेक्षा मूल्यांची अधिक महत्त्व असायला हवी, अशी तीव्र टीका त्यांनी केली.










































