शिंंदेंचा आमदार शपथ घेताना अडखळला

0
32

मुंबई, दि. 09 (पीसीबी) : विशेष अधिवेशनाच्या कार्यक्रम पत्रिकेत दोन दिवस नवनिर्वाचित आमदारांच्या शपथविधीसाठी ठेवले होते. तर तिसऱ्या दिवशी राज्यपालांचे अभिभाषण आणि विधानसभा अध्यक्षांची निवड असा कार्यक्रम जाहीर केला होता. २८७ पैकी पहिल्या दिवशी १७३ तर दुसऱ्या दिवशी १०६ आमदारांनी शपथ घेतली. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृ्त्वातील शिवसेनेचे आमदार आमश्या पाडवी यांनीही शपथ घेतली. मात्र शपथ घेताना पाडवींची पुरती त्रेधातिरपीट उडाली.

विधानसभेच्या विशेष अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी आमदारकीची शपथ घेताना आमश्या पाडवी हे गोंधळल्याचं पाहायला मिळालं. हंगामी अध्यक्षांनी शब्द न् शब्द सांगूनही पाडवी शपथ घेताना अडखळत होते. “भारतीय संविधानाद्वारे स्थापित” हे म्हणता म्हणता त्यांची पुरेवाट झाली. भारताची सार्वभौमता म्हणतानाही त्यांचा गोंधळ उडाला.

कोण आहेत आमश्या पाडवी?
आमश्या पाडवी हे नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघातून आमदार आहेत. आमश्या पाडवी यांनी शिवसेनेच्या तिकिटावर २०१४ आणि २०१९ मध्ये निवडणूक लढवली होती, परंतु सलग दोन्ही वेळा त्यांना पराभवाचा धक्का बसला. २०२२ मध्ये त्यांची विधानपरिषदेवर वर्णी लागली.