शाहू महाराजांनी खऱ्या अर्थाने समता प्रस्थापित केली : सतीश काळे

0
403

संभाजी ब्रिगेडच्या वतीने छत्रपती राजर्षी शाहू महाराजांना अभिवादन

पिंपरी दि. २६ ( पीसीबी) –
छत्रपती शाहू महाराजांनी सर्व जाती धर्मातील लोकांसाठी योग्य अशा राज्याची निर्मिती केली. सगळ्या जाती धर्मातील विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह निर्माण केले. आपल्या राज्यात खऱ्या अर्थाने समता स्थापन करण्याचे काम शाहू महाराजांनी केले असे प्रतिपादन संभाजी ब्रिगेडचे पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष सतीश काळे यांनी केले.

केएसबी चौक चिंचवड येथे संभाजी ब्रिगेडच्या वतीने शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. संभाजी ब्रिगेडचे शहर कार्याध्यक्ष संजय जाधव यांच्या हस्ते शाहू महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. तसेच उपस्थित शाहू प्रेमींना मिठाईचे वाटप करण्यात आले.
यावेळी संभाजी ब्रिगेडचे सचिव मंगेश चव्हाण, उपाध्यक्ष नितीन जाधव, संघटक विनोद घोडके, महेश कांबळे, बाळासाहेब वाघमारे, योगेश पाटील, संतोष सुर्यवंशी, विजय शेलार यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.