शाहूनगरला दारूच्या नशेत मित्राला बेदम मारहाण

0
288

चिंचवड, दि.४ (पीसीबी)- दारूच्या नशेत एकाने मित्राला बेदम मारहाण केली. यामध्ये मारहाण झालेल्या मित्राच्या तीन बरगड्या फ्रॅक्चर झाल्या. ही घटना मंगळवारी (दि. 2) दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास शाहूनगर चिंचवड येथील शाहू उद्यानात घडली.

सचिन अशोक जगताप असे जखमी व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी सचिन यांच्या आईने एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार भूषण कैलास पवार (वय 33, रा. स्पाईन रोड, भोसरी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा मुलगा सचिन जगताप आणि आरोपी भूषण पवार हे मित्र आहेत. ते मंगळवारी दुपारी शाहूनगर येथील शाहू उद्यानात बसले होते. तिथे त्यांच्यात जुन्या भांडणाच्या कारणावरून वाद झाला. त्यातून भूषण याने सचिन यांच्या पोटावर दगड मारला. त्यामध्ये सचिन यांच्या तीन बरगड्या फ्रॅक्चर झाल्या. या घटनेत सचिन हे गंभीर जखमी झाले आहेत. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.