शासनाने महिला उद्योजकांसाठी महिला उद्योग कक्ष उभारण्याची उद्योगमंत्र्यांकडे मागणी

0
678

मुंबई, दि. ६ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड एमआयडीसी क्षेत्रामधील महिला उद्योजकांच्या समस्या मार्गी लावाव्यात. शासनाने महिला उद्योजकांसाठी विशिष्ट महिला उद्योग कक्ष उभारावा, अशी मागणी पिंपरी-चिंचवड महिला लघुउद्योजक संघटनेच्या अध्यक्षा दुर्गा भोर यांनी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्याकडे केली आहे.

मुंबईत उद्योगमंत्री देसाई यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. त्यात भोर यांनी म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड एमआयडीसी क्षेत्रामध्ये अनेक महिला उद्योजक उद्योग करतात. परंतु, त्यांना जागेची टंचाई भासते. महिला जास्त मोठ्या प्रमाणात जागे मध्ये भांडवलाची गुंतवणूक करू शकत नाहीत. त्यासाठी छोट्या स्मॉल स्केल लघु उद्योग करणाऱ्या महिलांसाठी विशिष्ट गाळा प्रकल्प अथवा शासनाने जागा उपलब्ध करून दिल्यास त्या ठिकाणी महिलांचा समूह व्यवसाय उत्तमरित्या चालू शकेल.

अनेक महिलांच्या नावाने स्थावर मालमत्ता नसल्याने त्यांना उद्योग करण्यासाठी भांडवलाची टंचाई भासते. कागदपत्रांची पूर्तता करता येत नाही. त्यासाठी शासनाने महिला उद्योजकांसाठी विशिष्ट महिला उद्योग कक्ष उभारल्यास महिलांना त्या ठिकाणी आपल्या अडचणींवर मात करण्यास सुलभ होईल.

त्यावर उद्योगमंत्री देसाई यांनी महिला उद्योगांसाठी ज्या प्रकारची मदतीची अपेक्षा आहे. ती पूर्ण केली जाईल. शासनाची सहकार्याची भूमिका राहील. महिला उद्योजकांच्या समस्यांबाबत लवकरात लवकर काढला जाईल. समस्या सोडविण्यात येतील, असे आश्वासन दिल्याचे भोर यांनी सांगितले.