शाश्वत शेती-समृद्ध शेतकरी विभागांसाठी तरतूद

0
364

मुंबई, दि.९ (पीसीबी)- मुंबई, दि.९ (पीसीबी)- राज्याच्या अर्थसंकल्पात सर्व घटकांना खूश ठेवण्याचा प्रयत्न उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. शेतकरी, कामगार, कारखानदार, महिला, जेष्ठ नागरिक, विद्यार्थी, बेरोजगारांसह जाती धर्माचा आणि संत महात्मायंच्या स्मारकांसाठी घोषणांची खैरात आहे. सर्व महत्वाच्या घोषणांची गोषवारा मुद्दे पुढीलप्रमाणे आहे.

 प्रथम अमृत : शाश्वत शेती-समृद्ध शेतकरी विभागांसाठी तरतूद
– कृषी विभाग : 3339 कोटी रुपये
– मदत-पुनर्वसन विभाग : 584 कोटी रुपये
– सहकार व पणन विभाग : 1106 कोटी रुपये
– फलोत्पादन विभाग : 648 कोटी रुपये
– अन्न व नागरी पुरवठा विभाग : 481 कोटी रुपये
– पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय, मत्स्यव्यवसाय विभाग : 508 कोटी रुपये
– जलसंपदा, लाभक्षेत्र विकास, खारभूमी विभाग : 15,066 कोटी रुपये
– पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग : 3545 कोटी रुपये
– मृद व जलसंधारण विभाग : 3886 कोटी रुपये

प्रथम अमृत एकूण : 29,163 कोटी रुपये
द्वितीय अमृत : महिला, आदिवासी, मागासवर्ग,
ओबीसींसह सर्व समाजघटकांचा सर्वसमावेशक विकास
विभागांसाठी तरतूद
– महिला व बालविकास विभाग : 2843 कोटी रुपये
– सार्वजनिक आरोग्य विभाग : 3501 कोटी रुपये
– सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग : 16,494 कोटी रुपये
– इतर मागास बहुजन कल्याण विभाग : 3996 कोटी रुपये
– दिव्यांग कल्याण विभाग : 1416 कोटी रुपये
– आदिवासी विकास विभाग : 12,655 कोटी रुपये
– अल्पसंख्यक विकास विभाग : 743 कोटी रुपये
– गृहनिर्माण विभाग : 1232 कोटी रुपये
– कामगार विभाग : 156 कोटी रुपये

द्वितीय अमृत एकूण : 43,036 कोटी रुपये

स्मारके…
– भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर इंदूमिल स्मारक : 349 कोटी रुपये दिले/आणखी 741 कोटी रुपये देणार
– धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज तुळापूर आणि वढूबुद्रूक स्मारकांसाठी निधी
– भिडेवाडा (पुणे) येथे ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले राष्ट्रीय स्मारक: 50 कोटी रुपये
– लोकशाहीर अण्णाभाऊ साठे वाटेगाव (सांगली) स्मारक : 25 कोटी रुपये
– हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्मारक : 351 कोटी रुपये
– स्व. रा. सू. गवई स्मारक, अमरावती : 25 कोटी रुपये
– विचारवंत कै. नरहर कुरुंदकर स्मारक, नांदेडसाठी निधी
– स्व. शिवाजीराव देशमुख स्मारक, कोकरुड (सांगली) : 20 कोटी रुपये

महाराष्ट्राचे वैभव असलेल्या धार्मिक क्षेत्रांचा विकास

– श्री संत सेवालाल महाराज स्मारक पोहरादेवी, उमरी तीर्थक्षेत्र विकास : 500 कोटी रुपये
– भीमाशंकर, त्र्यंबकेश्वर, घृष्णेश्वर, औंढा नागनाथ, वैजनाथ या पाचही महाराष्ट्रातील ज्योर्तिंलिंगांसह प्राचीन मंदिरांच्या संवर्धनासाठी : 300 कोटी रुपये
– श्री क्षेत्र ज्योतिबा परिसर संवर्धन प्राधीकरण : 50 कोटी रुपये
– श्री संत गाडगेबाबा समाधीस्थळ, ऋणमोचन विकासासाठी : 25 कोटी रुपये
– श्री चक्रधर स्वामी महानुभाव संबंधित रिद्धपूर, काटोल, भिष्णूर, जाळीचा देव, पोहीचा देव, नांदेड, पांचाळेश्वर, पैठण विकासासाठी भरीव निधी
– प्रज्ञाचक्षू संत गुलाबराव महाराज स्मारकासाठी भरीव निधी
– गहिनीनाथ गडाच्या संवर्धन-विकासासाठी : 25 कोटी रुपये
– श्री संत जगनाडे महाराज आर्ट गॅलरी, नागपूर: 6 कोटी रुपये
– श्री संत जगनाडे महाराज समाधीस्थळ, सुदुंबरे (पुणे) : 25 कोटी रुपये

स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव स्मरण स्वातंत्र्यसमराचे…

– राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या प्रेरणेने झालेल्या स्वातंत्र्यलढ्याच्या स्मृत्यर्थ आष्टी, वर्धा येथे स्मारक
– विदर्भात झालेल्या जंगल सत्याग्रहाची तीन ठिकाणी स्मारके
– मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या अमृत महोत्सवानिमित्त पुरेसा निधी