शाळांच्या जवळील सिग्नलच्या वेळेत वाढ करा; राष्ट्रवादी अर्बन सेलची मागणी

0
258

पिंपरी दि. २१ (पीसीबी) – शहरात बंद असलेले आणि ब्लिंकर झालेले वाहतूक दिवे त्वरित चालू करावेत. तसेच पादचाऱ्यांना त्यांचा हक्काचा वेळ वाढवून द्यावा. ज्या सिग्नलच्या जवळ शाळा आहेत. त्या ठिकाणी 10 सेंकदाऐवजी 25 सेकंदाचा वेळ करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अर्बन सेलने केली आहे.

राष्ट्र्वादी अर्बन सेलच्या शहराध्यक्षा मनिषा गटकळ यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने वाहतूक नियंत्रण विभागाचे उपायुक्त आनंद भोईट यांची प्रत्यक्ष भेट घेवून मागणीचे निवेदन दिले. शहरात रस्त्याच्या कडेला काही ठिकाणी शाळा आहेत. लहान मुलांची ये-जा असते. परंतु, सिग्नलची वेळ कमी असल्याने वाहनचालक बेदारकपणे वाहन चालवितात. त्यामुळे दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यासाठी ज्या सिग्नलच्या जवळ शाळा आहेत. त्या ठिकाणी 10 सेंकदाऐवजी 25 सेकंदाचा वेळ करावी.

जेष्ठ नागरिकांचा विचार करुण काही ठिकाणची वेळ 15 ते 20 सेकंद करावी. अतिउत्साही लोक सिग्नल तोडून वेगात जातात. त्यामुळे अपघात होतात. त्यावर वाहतूक पोलिसांचे नियंत्रण असावे. पदपथाचे दिवे चालू असावेत, अशी मागणी निवेदनातून केली. त्यावर उपायुक्त आनंद भोईटे यांनी सर्वतोपरी सहकार्याचे आश्वासन दिले. त्याबाबत सर्व यंत्रणांना त्याबाबत सूचना दिल्याचे गटकळ यांनी सांगितले.

निवेदन देताना अर्बन सेल निरीक्षक आणि झोपडपट्टी सेल अध्यक्षा सुनीता अडसुळ, अर्बन सेल निरीक्षक मीरा कुदळे, अर्बन सेल जेष्ठ नागरिक कमिटी समन्वयक संगीता गोडसे, अर्बन सेल शहर सुधार कमिटी समन्वयक बबिता बनसोडे, अर्बन सेल युवती कमिटी समन्वयक मीरा कांबळे, झोपडपट्टी सेलच्या पिपरी विधानसभा अध्यक्षा शिला गायकवाड आदी महिला पदाधिकारी यावेळी उपस्थित होत्या.