शारीरिक संबंध ठेवण्याची मागणी करत तरुणीची बदनामी

0
673

थेरगाव, दि. २३ (पीसीबी) – जुने प्रेमसंबंध असलेल्या तरुणाने तरुणीकडे शैय्यासोबत करण्याची मागणी केली. त्यासाठी तरुणाने दबाव आणून दोघांचे सोबत काढलेले फोटो तरुणीच्या वडिलांना पाठवून तिची बदनामी केली. हा प्रकार रविवारी (दि. १९) सकाळी अकरा वाजता थेरगाव येथे घडला.

किरण उर्फ जगन्नाथ राजेंद्र चव्हाण (वय २२, रा. थेरगाव) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी २० वर्षीय पीडित तरुणीने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि फिर्यादी तरुणीचे पूर्वी प्रेमसंबंध होते. जुन्या प्रेमसंबंधाचा गैरफायदा घेऊन आरोपीने फिर्यादीला फोन करून त्याच्यासोबत शय्यासोबत करण्याची मागणी केली. ”मी सांगेल त्या हॉटेलवर मला भेटण्यासाठी आली नाहीस तर तुझ्या मोबाईलवर आणि सगळीकडे फोटो पाठवून बदनामी करेल’ अशी धमकी दिली. आरोपीने फिर्यादी तरुणीच्या वडिलांना फोन करून त्यांच्या मोबाईलवर दोघांचे फोटो पाठवून तरुणीची बदनामी केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.