शाम मेघराजानी यांचा बाजार समितीकडून विशेष सन्मान

0
304

पिंपरी, दि. १७ (पीसीबी) – आजादी का अमृत महोत्सव या अभियानात पुणे जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीने सन 2021ते 2022 या वर्षी समिती मार्फत विक्री होणार्‍या विविध मालाची जास्त खरेदी करणाऱ्या व त्या अंतर्गत 2021ते2022या वर्षी सर्वात जास्त बाजार समिती चा खरेदी वरील सेझ भरलयाने पिंपरी येथील प्रसिद्ध किराणा व्यापारी शाम मेघराजानी ( नंदलाल हसानंद )यांचा निवृत्त ब्रिगेडियर राजेंद्र निंभोरकर यांच्या हस्ते करण्यात आला कार्यक्रमाचे अध्यक्ष बाजार समिती चे मुख्य प्रशासक मधुकांत गरड सहसचिव राम गाडगे पुणे चेंबर्स मर्चंट चे अध्यक्ष राजेंद्र बांठिया, आडत असो चे अध्यक्ष बापू भोसले,विलास बुजबळ,गणेश ससते, शिवाजी गायकवाड हमाल पंचायत चे संतोष नांगरे, माजी पदाधिकारी आणि अधिकारी आदी उपस्थित होते.