शाखातील बोर्डांवर धनुष्यबाण हटवा मशाल चिन्ह लावा

0
96

दि. 3 ऑगस्ट (पीसीबी) पुणे,: पुण्याच्या पदाधिकारी मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांन संबोधित केले आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत शिवसेनेची आणि पर्यायाने महाविकास आघाडीती रणनीती काय असणार यावर त्यांनी प्रकाश टाकला तर, सत्ताधारी महायुती सरकारवर त्यांनी सडकून टीका केली. यावेळी त्यांनी ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांना महत्त्वाचे आवाहन करण्यात आले.

शाखा शाखातील बोर्डांवर जी धनुष्यबाणाची निशाणी आहे ती हटवा आणि त्या ठिकाणी मशाल चिन्ह लावा, असे आदेश माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली.महाराष्ट्रातील अनेक शिवसेनेच्या शाखांवरून वाद सुरू आहेत. शिंदे आणि ठाकरे गट या शाखांसाठी आमने सामने आलेले आहेत. त्यातच, ठाकरेंनी आता असे आदेश दिल्याने अनेक शाखांमध्ये वाद होण्याची शक्यता आहे.

देवेंद्र फडणवीसांवर टीका
“दोन दिवसांपूर्वी मुंबईतल्या सभेत बोललो की, एक तर तू राहशील किंवा मी राहिल. माझ्या पायाशी कलिंगड ठेवलेलं होतं. त्यामुळे काही जणांना वाटलं मी त्यांना आव्हान दिलं. मी कोणत्याही ढेकणाला आव्हान देत नाही. मी म्हणजे कोण आणि तू म्हणजे कोण? याची संकल्पना उद्धव ठाकरे यांनी सांगितली. मी म्हणजे माझा संस्कारी महाराष्ट्र आणि तू म्हणजे महाराष्ट्रावर दरोडे टाकणाऱ्या दरोडेखोरांचा पक्ष. ढेकणाला कधी आव्हान दिलं जात नाही, ढेकणं चिरडायची असतात. कुणीतरी हे आव्हान स्वतःवर घेतलं. त्यानं सांगितलं माझ्या नादाला लागू नका. मी म्हणतो, तुझ्या नादाला लागण्याएवढ्या किंमतीचा तू नाहीच आहेस”, अशी टीका शिवसेना उबाठा गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली.

आज पुण्यामध्ये उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेच्या पुण्यातील पदाधिकाऱ्यांचा मेळावा संपन्न झाला. यावेळी त्यांनी भाजपावर पुन्हा एकदा टीकास्र सोडले. “बऱ्याच वर्षांनंतर मी पुण्यात येत आहे. यापुढे लढाई मैदानात होणार, हॉलमध्ये होणार नाही”, असेही आव्हान त्यांनी यावेळी दिले.

वाघनखांवरून हल्लाबोल
“मुनगंटवारांनी नाघनखे आणली आहेत. पण अहो मुनगंटीवार, नखाच्या मागे वाघ असतो ना तेव्हा त्या वाघनखांना अर्थ असतो. त्या वाघनखांनी अफजल खानाचा कोथळा काढलेला आहे की नाही हा विषय वेगळा आहे. पण त्या नखाच्या मागे शिवाजी राजा म्हणून वाघ होता. म्हणून त्या नखाला महत्त्व आहे. त्या नखाच्या मागे मुनगंटीवार असतील तर वाघनखे आणि मुनटंगीवार कुठेतरी जुळतंय का? असा बोचरा सवालही त्यांनी उपस्थित केला.