शाईफेक प्रकऱणातूनच अखेर पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांची बदली

0
260

पिंपरी, दि. १३ (पीसीबी) : पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्यावर शाईफेक प्रकऱणात स्वतः पाटील यांनी सर्वांना माफ करत कारवाई मागे घेण्याचे प्रसिध्दीपत्रक रविवारीच प्रसिध्दीला दिले असताना आता याच मुद्यावर अखेर पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांचीच बदली झाली आहे. नवीन पोलीस आयुक्त म्हणून मुंबई पोलीस दलातील विनायक चोबे यांची नियुक्ती कऱण्यात आली आहे. दरम्यान, पुणे शहर पोलीस आयुक्त अमित गुप्ता यांची कायदा सुव्यवस्था, मुंबई अप्पर पोलीस महासचालक या पदावर बदली करण्यात आली असून रितेश कुमार हे पुणे शहराचे नवे पोलीस आयुक्त असतील. 

शाईफेक प्रकऱणात तीन हल्लेखारांना अटक करण्यात आली होती तसेच

तीन उपनिरीक्षकांसह आठ पोलीस कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले होते. तीन दिवस हे प्रकरण माध्यमांतून गाजले आणि रविवारी चंद्रकांत पाटील यांनी माफीनामा देत या प्रकरणावर आता चर्चा नको असे म्हटले होते. प्रत्यक्षात दुसऱ्याच दिवशी पोलीस आयुक्त शिंदे यांची बदली करण्यात आली.

चंद्रकांतदादा पाटील यांच्यावर शाईफेक प्रकऱणात पोलीसांनी पुरेशी खबरदारी घेतली नाही, असा आक्षेप आहे. त्याशिवाय या प्रकरणात कारवाई करतानाही हलगर्जीपणा झाल्याचा ठपका पोलिसांवर आला आहे. शहरातील वाढती गुन्हेगारी आणि शाईफेक प्रकरण अखेर शिंदे यांच्या अंगलट आले आणि मुदत पूर्ण होण्याच्या आतच त्यांची बदली करण्यात आली.