लातूर, दि. ९ (पीसीबी) – चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक करणाऱ्या समता सैनिक दलाचा सैनिक मनोज गरबडे काल विवाहबंध झाला. त्याच्या लग्नाचे फोटो समता सैनिक दलाच्या कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर व्हायरल केले आहेत. लातूर येथील आत्माराम एकनाथ गरबाडे यांची कन्या पुजा हिच्या समवेत मनोज याचा मंगल परिणय रविवारी संपन्न झाला.
मनोज गरबडे यांच्या विवाह सोहळ्याला काल राज्यभरातील समता सैनिक दलाचे सैनिक उपस्थित होते. अनेकांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. मनोज गरबडे हा मुळचा उस्मानाबाद जिल्ह्यातील. तिथेच शालेय शिक्षण आणि महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले आणि एका नामांकित कंपनीत मॅनेजर म्हणून तो दाखल झाला होता. सामाजिक कार्याची उर्मी शांत बसू देेत नसल्याने त्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या समता सैनिक दलात पूर्णवेळ कार्यकर्ता म्हणून काम सुरु केले. कोरेगाव भिमा प्रकऱणातही मनोज गरबडे याचे नाव चर्चेत आले होते. केंद्राय मंत्री रामदास आठवले यांची सभा उधळून लावण्याचे काम त्याने केले होते. अनेक आंदोलनांतून, चळवळींतूनही मनोज गरबडे याचा सहभाग असतो. शाईफेक प्रकऱणानंतर आंंबेडकरी जनतेमधून सर्व गटतट विसरुन गरबडे याला मोठे पाठबळ मिळाल्याने तो प्रकाशझोतात आला. आता तो विविहबंधनात अडकला आहे.
मनोज गरबडे यांचा विवाह सोहळा संपन्न झाल्यापासून लग्नाला उपस्थित असलेल्या लोकांनी तिथले फोटो शेअर केले आहेत. मनोज गरबडे यांचा विवाह सोहळा काल लातूरमध्ये संपन्न झाला. एका कैदेतून सुटका झाली असली तरी, आयुष्यभरासाठी लग्नबंधनात कैद झाल्याबद्दल… मनोज भाऊ आणि वाहिनीचे खूप खूप अभिनंदन अशा शुभेच्छा मान्यवरांनी सोशल मीडियावर दिल्या आहेत. मनोज गरबडे यांचा विवाह सोहळा संपन्न झाल्यापासून लग्नाला उपस्थित असलेल्या लोकांनी तिथले फोटो शेअर केले आहेत.