शांता शेळके यांच्या कविता वाचून असा दिला आठवणींना उजाळा

0
1078

पिंपरी, दि. ८ (पीसीबी) – ६ जून हा, शब्दवैभव शान्ता शेळके यांचा स्मृतिदिन. महाराष्ट्र साहित्य परिषद पिंपरी चिंचवड आयोजित कार्यक्रमात पिंपरी चिंचवड येथील साहित्यिकांनी शान्ता शेळके यांची एक कविता वाचून त्यांना मानवंदना दिली तसेच त्यांच्या आठवणींना उजाळा दिला.
यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे महाराष्ट्र साहित्य परिषद चाळीसगाव शाखेचे अध्यक्ष प्राचार्य तानसेन जगताप, विदर्भ साहित्य संघ नागपूरचे शाखा समन्वय सचिव प्रदीप दाते, आटोक्लस्टर चिंचवड चे व्यवस्थापकीय संचालक किरण वैद्य, महाराष्ट्र साहित्य परिषद पिंपरी चिंचवडचे अध्यक्ष राजन लाखे, उपाध्यक्षा डॉ. रजनी शेठ उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरवातीला शान्ता शेळके यांच्या प्रतिमेचे पूजन करुन, प्रातिनिधिक तत्वावर महाराष्ट्रातील साहित्य क्षेत्रातील, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे, नाट्य क्षेत्रातील लेखक, नाटककार अभिराम भडकमकर, शैक्षणिक क्षेत्रातील डॉ. डी. वाय पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील, तर चित्रपट क्षेत्रातील अभिनेत्री तसेच कवयित्री मधुराणी प्रभुलकर यांनी शांताबाईंना वाहलेली मानवंदना ” चित्रफित द्वारे ” उपस्थित मान्यवरांना व रसिकांना दाखवण्यात आली. त्यानंतर उपस्थित साहित्यिकांनी त्यांच्या आठवणींना उजाळा देउन शान्ताबाईची एक कविता वाचून त्यांना अभिवादन केले. यामध्ये डॉ. समिता टिल्लू, पुरषोत्तम सदाफुले, श्रीकांत चौगुले, राज अहेरराव, विनोद अष्टूळ, नागेश गव्हाड़, जयंत श्रीखंडे, ज्योती कानेटकर, विनीता श्रीखंडे, दीपक अमोलिक, किरण जोशी, रमाकांत श्रीखंड़े, योगिता कोठेकर, विवेक म्हस्के यांनी सहभाग घेतला.

अतिथी तानसेन जगताप, किरण वैद्य, यांनी मनोगत व्यक्त करताना शान्ता शेळके जन्मशताब्दी महोत्सव हा उपक्रम वर्षभर उत्साहाने राबवणर्या मसाप पिंपरी चिंचवड ला शुभेच्छा दिल्या. तसेच वर्धा येथे होणार्या ९६ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे संयोजक प्रदीप दाते यांनी मोठ्या संख्येने संमेलनात सामील होण्याबाबत आवाहन केले.