शहर भाजपची जम्बो कार्यकारिणी’ जाहीर, जगताप यांचे वर्चस्व, राजू दुर्गे प्रवक्ते

0
458

पिंपरी,दि.१८(पीसीबी) – पिंपरी चिंचवड शहर भाजपची जम्बो कार्यकारिणी तब्बल दोन महिन्यानंतर रविवार (दि.17 ) शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी जाहीर केली. यामध्ये दहा उपाध्यक्ष, सहा सरचिटणीस, दहा चिटणीस, एक कोषाध्यक्ष आणि सात मोर्चासह 25 सेलचे विविध पदाधिकारी आणि 64 कार्यकारिणी सदस्य अशी ‘जम्बो कार्यकारिणी’ करुन त्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत.

भाजप पिंपरी चिंचवड अध्यक्षपदी शंकर पांडुरंग जगताप यांची निवड करण्यात आली आहे. शंकर जगताप यांनी भाजपचे चिंचवड विधानसभा निवडणूक प्रमुख म्हणून काम पाहिले आहे. आगामी लोकसभा, विधानसभा आणि महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीच्या शहर नेतृत्वाची धुरा शंकर जगताप यांच्याकडे सोपवली आहे.

जगताप यांनी चिंचवड विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत आपल्या नेतृत्वाची चुणूक दाखवली होती. ते पोटनिवडणुकीतील भाजपच्या विजयाचे शिल्पकार ठरले होते. त्यामुळे त्यांच्याकडे शहराध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.

2014 च्या विधानसभा निवडणुकीनंतर भारतीय जनता पार्टीला अच्छे दिन आले आहेत. चिंचवड मतदारसंघाचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप हे शहरातील भाजपचे पहिले आमदार म्हणून निवडून आले. त्यानंतर त्यांच्याकडे भारतीय जनता पार्टीने शहराध्यक्षपदाची जबाबदारी दिली. या संधीचे सोने करत दिवंगत लक्ष्मण जगताप यांनी 2017 मध्ये पिंपरी-चिंचवड महापालिकेत भाजपची प्रथमच सत्ता आणून दाखवली. त्यांनी स्पष्ट बहुमतासह महापालिकेत भाजपचे कमळ फुलवले होते.

दरम्यान, भाजपच्या शहराध्यक्ष पदी शंकर जगताप यांची निवड झाल्यानंतर त्यांनी पिंपरी, चिंचवड आणि भोसरी विधानसभा मतदारसंघातील जून्या-नव्यासह निष्ठावंत भाजप कार्यकर्त्यांना कार्यकारिणीत समावून घेत काम करण्याची संधी दिली आहे. तब्बल दोन महिन्यानंतर भाजपची शहर कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. त्यामुळे लोकसभा, विधानसभा आणि महापालिका निवडणुकीसाठी ही जम्बो कार्यकारिणी जाहीर केल्याचे पहावयास मिळत आहे.

अध्यक्ष – शंकर पाडुरंग जगताप

उपाध्यक्ष पदी –
1 राजू अनंत दुर्गे (वरिष्ठ उपाध्यक्ष/ व पक्ष प्रवक्ते)
2 माऊली मुरलीधर थोरात
3 रवींद्र बाळकृष्ण देशपांडे
4 विनोद भवरलाल मालू
5 विशाल मनोहर कलाटे
6 सिद्धेश्वर बाळासाहेब बारणे
7 विभीषण बाबू चौधरी
8 पोपट सुखदेव हजारे
9 बाळासाहेब दिगंबर भुंबे
10 आशा दत्तात्रय काळे

सरचिटणीस पदी –
1 शितल उर्फ़ विजय गोरख शिंदे
2 अजय संभाजी पाताडे
3 शैला दामोदर मोळक
4 संजय उमाजी मंगोडेकर
5 नामदेव जनार्धन ढाके
6 विलास हनुमंतराव मडिगेरी

चिटणीस पदी –
1 मधुकर बहिरू बच्चे
2 राजश्री काकासाहेब जायभाय
3 गीता प्रवीण महेंद्रू
4 विजय जगन्नाथ शिनकर
5 सागर मुकुंद फुगे
6 कविता विनायक भोंगाळे
7 हिरेन अशोकभाई सोनावणे
8 देवदत्त गोविंदराव लांडे
9 विशाल प्रदीप वाळुंजकर
10 महेंद्र श्रीकृष्ण बाविस्कर

कोषाध्यक्ष पदी – संतोष शंकर निंबाळकर

महिला मोर्चा (अध्यक्ष) –
सुजाता सुनील पालांडे

सरचिटणीस महिला मोर्चा- वैशाली प्रशांत खाडये

युवा मोर्चा (अध्यक्ष) – तुषार रघुनाथ हिंगे

सरचिटणीस युवा मोर्चा – राज हेमंत तापकीर

किसान मोर्चा
संतोष भाऊसाहेब तापकीर

अनुसूचित जाती मोर्चा
भीमा सखाराम बोबडे

ओबीसी मोर्चा
राजेंद्र शंकर राजापुरे

आदिवासी मोर्चा
पांडुरंग लक्ष्मण कोरके

अल्पसंख्यांक मोर्चा
सलीम अब्दुल शिकलगार

प्रकोष्ठ सेल
कामगार आघाडी – नामदेव भगवान पवार
उद्योग आघाडी – अतुल अशोक इनामदार
व्यापारी आघाडी – भरत सोहनराज सोलंकी
उत्तर भारतीय आघाडी – सुखलाल सिजोर भारती
दक्षिण भारतीय सेल – सुरेश नागेश नायर
भटके विमुक्त आघाडी – गणेश रामराव ढाकणे
वैद्यकीय प्रकोष्ठ – डॉ.प्रताप पोपटराव सोमवंशी
कायदा सेल अध्यक्ष – अॅड.गोरखनाथ गेनबा झोळ
कायदा सेल सरचिटणीस – अॅड.दत्ता हरिश्चंद्र झुळूक
सहकार सेल – माधव मल्लिकार्जुन मनोरे
ट्रान्सपोर्ट सेल – दिपक नारायण मोडवे
सोशल मीडिया सेल – अमेय भगवान देशपांडे
माजी सैनिक सेल – रामदास गणपत मदने
ज्येष्ठ कार्यकर्ता सेल – बळवंत नारायण कदम
दिव्यांग सेल – शिवदास किसन हांडे
बुद्धिजीवी सेल – मनोजकुमार हरिश्चंद्र मारकड
शिक्षक सेल – दत्तात्रय लक्ष्मण यादव ( सोळसकर)
अध्यात्मिक समन्वय प्रकोष्ट – अप्पा उर्फ जयंत गेनूभाऊ बागल
पदवीधर प्रकोष्ठ – राजेश मधुसुधन पाटील
क्रीडा प्रकोष्ट – जयदीप गिरीश खापरे
जैन प्रकोष्ट – सुरेश हस्तीमल गादिया
सांस्कृतिक सेल – विजय बबनराव भिसे
आयटी सेल – चैतन्य अण्णासाहेब पाटील
आयुष्यमान भारत सेल – गोपाळ काशिनाथ माळेकर
राजस्थान प्रकोष्ट – मोहनलाल केसाजी चौधरी
बेटी बचाव बेटी पढाओ – प्रीती प्रणव कामतीकर

कार्यकारिणी सदस्य –
1 तेजस्विनी ढोमसे सवाई
2 जयश्री भीमाशंकर वाघमारे
3 रेखा करण कडाली
4 जयश्री किशोर मखवाना
5 विमल अनिल काळभोर
6 राधिका रवींद्र बोर्लीकर
7 पुष्पा अरुण सुबंध
8 मनीषा चंद्रकांत शिंदे
9 भावना सुदर्शन पवार
10 दिपाली भगवान धनोकार
11 पूनम सुधीर गोडे
12 रेखा रविंद्र काटे
13 रोहिणी प्रसाद रासकर
14 शीतल लक्ष्मण कुंभार
15 मनिषा प्रमोद पवार
16 जयश्री युवराज नवगिरे
17 पल्लवी चंद्रकांत मारकड
18 सोनाली प्रशांत शिंपी
19 प्रज्ञा प्रकाश हितनाळीकर
20 सीमा जयसिंगराव चव्हाण
21 सविता शेखर कर्पे
22 सुनिता जालिंदर खराडे
23 पल्लवी सुधीर वाल्हेकर
24 माधवी श्रीहरी इनामदार
25 कीर्ती अभिजित परदेशी
26 मुक्ता निलेश गोसावी
27 डॉ. कविता अतुल हिंगे
28 अलका हेमंत पांडे
29 सुप्रिया महेश चांदगुडे
30 कमल प्रिभरदाल मलकानी
31 नीता बापू कुशारे
32 शोभा किसान भराडे
33 दिपाली अजित करंजकर
34 आदेश शिवाजी नवले
35 धर्मा वामन पवार
36 प्रदीप चंद्रकांत सायकर
37 अन्ना दशरथ गरजे
38 प्रमोद विनायक येवले
39 दीपक राजमल नागरगोजे
40 महेश रंगनाथ बारसावडे
41 संदीप काशिनाथ गाडे
42 देविदास जिजाऊ पाटील
43 जयेश शिवराज चौधरी
44 गणेश रामचंद्र वाळूंजकर
45 गोपीचंद नथुराम आसवानी
46 नेताजी शिवाजी शिंदे
47 मनोज चंद्रसेन तोरडमल
48 गणेश चंद्रकांत लंगोटे
49 कैलास गणपत कुटे
50 भावेन रविशंकर पाठक
51 राकेश कारनाकरण नायर
52 विकास कमलेश मिश्रा
53 शशिकांत भीमराव पाटील
54 रामदास दशरथ काळजे
55 दत्ता दगडू तापकीर
56 सुभाष किसन सरोदे
57 गोरखनाथ लक्ष्मण तरस
58 विनोद चंद्रशेखर पाटील
59 नंदू उर्फ नितीन विश्वनाथ भोगले
60 नितीन मुरलीधर अमृतकर
61 सुधाकर श्रीनिवास काळे
62 यशवंत विनायक कोळेकर
63 कुणाल दशरथ लांडगे
64 लक्ष्मण दत्तू टकले