शहर पोलीस दलातील 17 पोलीस निरीक्षकांच्या बदल्या

0
386

पिंपरी, दि. ६ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड शहर पोलीस दलातील 17 पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या झाल्या. याबाबतचे आदेश मंगळवारी (दि. 5) रात्री पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी दिले.

सतीश नांदूरकर (सांगवी वाहतूक विभाग येथून गुन्हे शाखा युनिट 2), ज्ञानेश्वर साबळे (आळंदी पोलीस ठाणे येथून महाळुंगे पोलीस चौकी), रवींद्र जाधव (दिघी आळंदी वाहतूक विभाग येथून पोलीस नियंत्रण कक्ष), शिवाजी गवारे (पोलीस नियंत्रण कक्षाशी संलग्न येथून भोसरी एमआयडीसी पोलीस ठाणे), श्रीराम पौळ (रावेत पोलीस ठाणे येथून पोलीस नियंत्रण कक्ष), शहाजी पवार (नियंत्रण कक्ष येथून दिघी आळंदी वाहतूक विभाग), रघुनाथ उंडे (पिंपरी वाहतूक विभाग येथून निगडी पोलीस ठाणे), शंकर बाबर (गुन्हे शाखा युनिट 3 येथून विशेष शाखा), जितेंद्र कदम (भोसरी पोलीस ठाणे येथून जलद प्रतिसाद पथक), रामदास इंगवले (गुन्हे शाखा युनिट 5 येथून दरोडा विरोधी पथक), अरविंद पवार (महाळुंगे पोलीस चौकी येथून भोसरी पोलीस ठाणे), राम राजमाने (चिंचवड वाहतूक विभाग येथून युनिट 3), दशरथ वाघमोडे (महाळुंगे पोलीस चौकी येथून दिघी पोलीस ठाणे), किशोर पाटील (चिंचवड पोलीस ठाणे येथून म्हाळुंगे पोलीस चौकी), मधुकर माणिकराव खंडाळे (आर्थिक गुन्हे शाखा येथून युनिट 5), नितीन लांडगे (भोसरी पोलीस ठाणे येथून तळेगाव दाभाडे पोलीस ठाणे) या पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या झाल्या आहेत.

दरम्यान सोमवारी आयुक्तांनी दोन पोलीस निरीक्षकांना आणि दोन उपनिरीक्षकांना संलग्न केले. त्यानंतर लगेच दुस-या दिवशी 17 निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.